Mumbai Septic Tank Incident Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: सेप्टिक टँक साफ करताना मुंबईत मोठी दुर्घटना, एका कामगाराचा मृत्यू; दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक

Mumbai Septic Tank Incident: मुंबईतल्या पवईमध्ये मोठी दुर्घटना घडली. सेप्टिक टँक साफ करत असताना एका कामगाराचा मृत्यू झाला. तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत.

Priya More

Summary -

  • पवईतील हिरानंदानी भागात मोठी दुर्घटना

  • सेप्टिक टँकमध्ये साफसफाईदरम्यान एका कामगाराचा मृत्यू

  • आतमध्ये वायूमुळे गुदमरून ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती

  • अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली

मयूर राणे, मुंबई

मुंबईमध्ये सेप्टिक टँक साफ करत असताना एका कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईच्या पवई भागात घडली. सेप्टिक टँक साफ करण्यासाठी ३ कामगार खाली उतरले होते. पण सेप्टिक टँकमध्ये असलेल्या वायूमुळे ते गुदमरून खाली पडले. या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत कामगारांना बाहेर काढले आणि हिरानंदानी रुग्णालयात दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या पवई हिरानंदानी येथील राज ग्लँडर या गगनचुंबी बिल्डिंगमधील अंडर ग्राउंड सेप्टिक टँक साफ करण्यासाठी आज सकाळी ३ कामगार आले होते. सफाईचे काम करत असताना आतमध्ये असलेल्या वायूमुळे दोन कामगार चक्कर येऊन खाली पडले. यामधील एका कामगाराचा मृत्यू झाला. तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. तिसरा वेळीच बाहेर आल्यामुळे त्याचे प्राण वाचले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी कामगारांना बाहेर काढले. त्यावेळी दोन्ही कामगारांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना तात्काळ हिरानंदानी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी उपचारादरम्यान एकाला मृत घोषीत केले. तरु दुसऱ्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून ते तपास करत आहेत.

या दुर्घटनेमध्ये बचावलेल्या एका कामगाराने सांगितले की, सेप्टिक टँक सफाई करण्यासाठी आधी एक कामगार खाली उतरला. तो बराच वेळ बाहेर आला नाही त्यामुळे दुसरा कामगार खाली उतरला. पण दोघेही आतमध्ये पडले. दोन्ही कामगार बाहेर येत नसल्यामुळे मी देखील खाली उतरत होतो पण मी अर्ध्यातूनच बाहेर आलो.' या घटनेमध्ये एकाला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसऱ्याचा जीव गेला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney damage: डोळ्यांमध्ये दिसणारे हे ५ बदल वेळीच ओळखा; किडनी खराब होण्याची असतात लक्षणं

Black Raisins: लोखंडाप्रमाणे मजबूत हाडं हवीत? मग 'या' पदार्थाचं करा सेवन

Maharashtra Live News Update: मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून बीड शहरात नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका सुरू

Delhi Blast: स्फोट घडवण्यासाठी दोन कारचा वापर? i20 नंतर EcoSport कारचा शोध सुरू

कर्णबधिर असल्याचे भासवून थेट तहसीलदाराची नोकरी मिळवली? प्रशासकीय वर्तुळात खळबळ| VIDEO

SCROLL FOR NEXT