Mumbai News : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील २२ तास या भागात पाणीपुरवठा राहणार बंद

Mumbai Water Supply Close : मुंबई महानगरपालिकेकडून १४ नोव्हेंबर सकाळी १० ते १५ नोव्हेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. घाटकोपर, कुर्ला, चेंबूर, सायन आणि वडाळा भागातील नागरिकांना २२ तास पाण्याची टंचाई जाणवणार आहे.
Mumbai News : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील २२ तास या भागात पाणीपुरवठा राहणार बंद
Mumbai NewsSaam Tv
Published On
Summary

बीएमसीकडून १४ ते १५ नोव्हेंबरदरम्यान २२ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार

तानसा आणि विहार जलवाहिनीवरील पाच व्हॉल्व्ह बदलण्याचे काम सुरू होणार

घाटकोपर, कुर्ला, चेंबूर, सायन, वडाळा भागातील नागरिकांवर परिणाम होणार

मुंबईकरांना पाणी साठवून ठेवण्याचे आणि जपून वापरण्याचे आवाहन बीएमसीने केले आहे

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! सलग २२ तास मुंबईतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुख्य पाण्याच्या पाईपलाईनवरील एकूण पाच व्हॉल्व्ह बदलण्याचे देखभालीचे काम बीएमसी हाती घेणार आहे. यासाठी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत असे एकूण २२ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे बीएमसीकडून मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या आणि नवीन तानसा जलवाहिनी, तसेच विहार ट्रंक मेनवरील एकूण पाच व्हॉल्व्ह (चार बटरफ्लाय व्हॉल्व्ह आणि एक स्लूइस व्हॉल्व्ह) बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत करण्याचे नियोजन आहे. यामुळे, घाटकोपर, कुर्ला, चेंबूर आणि माटुंगा, वडाळा, सायन भागातील काही भागात २२ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. (water shortage)

Mumbai News : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील २२ तास या भागात पाणीपुरवठा राहणार बंद
Ajit Pawar News : धवलसिंह मोहिते पाटील अजित पवारांच्या भेटीला, राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना वेग

दादर-सायन परिसरातील 'या' भागात पाणीपुरवठा २२ तास बंद राहणार

सायन (पूर्व आणि पश्चिम), दादर पूर्व, माटुंगा पूर्व, वडाळा, चुनाभट्टीचा काही भाग, प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, आल्मेडा कंपाऊंड, पंचशील नगर, वडाळा ट्रक टर्मिनल, सोडा बिल्डिंग्स (न्यू कफ परेड), सायन कोळीवाडा-सरदार नगर, संजय नगर, गांधी नगर, गांधी नगर, गावचा भाग मिठागर, वडाळा आणि भीमवाडीचे प्रवेशद्वार क्र. 4 आणि 5.

Mumbai News : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील २२ तास या भागात पाणीपुरवठा राहणार बंद
Maharashtra Politics : महानगरपालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 'हा' बडा नेता धनुष्यबाण हाती घेणार

कुर्ला परिसरातील 'या' भागात पाणीपुरवठा २२ तास बंद राहणार

न्यू टिळक नगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांती नगर, नेहरू नगर, मदर डेअरी रोड, शिवसृष्टी रोड, नाईक नगर, जागृती नगर, केदारनाथ मंदिर मार्ग, एस.जी. बर्वे मार्ग (कुर्ला पूर्व), नवरे बाग, कामगार नगर, कामगार नगर, पोलीस कोठडी, हनुमान नगर. चुनाभट्टी, राहुल नगर, एव्हरर्ड नगर, कुरेशी नगर, तक्षशिला नगर, चाफे गल्ली, पान बाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही.एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, अलीदादा इस्टेट, राजीव गांधी नगर, स्वदेशी जीवन चाळ, चुनाभट्टी फाटक, म्हाडा कॉलनी, म्हाडा कॉलनी, मुरब्बी रोड, नागरवाडी, मुरब्बी मार्ग. नगर.

Mumbai News : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील २२ तास या भागात पाणीपुरवठा राहणार बंद
Accident News : दुर्दैवी! बोहोल्यावर चढण्याआधी काळाचा घाला, नवरदेवासह एकाच घरातील तीन भावांचा भीषण अपघातात मृत्यू

चेंबूर परिसरातील 'या' भागात पाणीपुरवठा २२ तास बंद राहणार

टिळक नगर, टिळक नगर स्टेशन रोड, पेस्तोम सागर रोड क्र. 1 ते 6, ठक्कर बाप्पा कॉलनी (सेक्टर 1 ते 4), शास्त्री नगर, वत्सलाताई नाईक नगर, सहकार नगर, शेल कॉलनी, इंदिरा नगर, एसजी बर्वे मार्ग, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर (गोड रोड, कॉलनी रोड) आम्ही सेवा देत आहोत. यशवंत नगर, सम्राट अशोक नगर, राजा मिलिंद नगर, आदर्श नगर, भक्ती पार्क, अजमेरा कॉलनी, एमएमआरडीए एसआरए कॉलनी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com