Accident News : दुर्दैवी! बोहोल्यावर चढण्याआधी काळाचा घाला, नवरदेवासह एकाच घरातील तीन भावांचा भीषण अपघातात मृत्यू

Hariyana Accident News : हरियाणामध्ये एका घरातील चार भावांचा हरिद्वारला जाताना भीषण अपघातात मृत्यू झाला. यातील एकाचा दुसऱ्यादिवशी विवाह ठरला होता. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
Accident News : दुर्दैवी! बोहोल्यावर चढण्याधी काळाचा घाला, नवरदेवासह एकाच घरातील तीन भावांचा भीषण अपघातात मृत्यू
Accident NewsSaam tv
Published On
Summary

हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाला

या अपघातात एकाच घरातील चार भावांचा जागीच मृत्यू झाला

मृतांपैकी एकाचा दुसऱ्यादिवशी विवाह होणार होता

अपघातानंतर कुटुंब आणि गावावर शोककळा पसरली आहे

हरियाणामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकाच घरातील चार भावांचा अपघातात मृत्यू झाला आहे. धक्कदायक म्हणजे यातील एका तरुण दुसऱ्यादिवशी लग्नबंधनात अडकणार होता. या घटनेने कुटुंबियांसह गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील बडोदा गावातील चार भाऊ गंगेत स्नान करण्यासाठी हरिद्वारला कारमधून जात होते. कार इतक्या वेगाने जात होती की चालकाचे नियंत्रण सुटले. परिणामी, त्यांची स्विफ्ट कार एका रेस्टॉरंटच्या बाहेर उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढचा भाग पूर्णपणे चिरडला गेला आणि ट्रकची चाकेही तुटली.

Accident News : दुर्दैवी! बोहोल्यावर चढण्याधी काळाचा घाला, नवरदेवासह एकाच घरातील तीन भावांचा भीषण अपघातात मृत्यू
EPFO News : EPFO ने केला मोठा बदल! पीएफ ट्रान्सफरसाठी HR ची गरज नाही, नोकरी बदलल्यावर २ दिवसात पैसे ट्रान्सफर होणार

मोठा आवाज ऐकून जवळच्या लोकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेच्या वेळी चारही तरुण कारमध्ये होते आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख आशिष, परमजीत, विवेक आणि साहिल अशी झाली आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलिसांनी मृतदेह कारमधून बाहेर काढले आणि पोस्टमॉर्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. अपघातानंतर पोलिसांनी कुटुंबियांना माहिती दिली. कारचा नंबर आणि तरुणांकडून मिळालेल्या कागदपत्रांचा वापर करून त्यांच्या पालकांशी संपर्क साधला.

Accident News : दुर्दैवी! बोहोल्यावर चढण्याधी काळाचा घाला, नवरदेवासह एकाच घरातील तीन भावांचा भीषण अपघातात मृत्यू
Shocking : महाराष्ट्र हादरला! नेहमीच्या वादाला कंटाळला, १६ वर्षाच्या मुलानं बापाला संपवलं

दरम्यान या चार भावांपैकी एकाच लग्न गेल्यावर्षीचं झालं होत. तर दोघांची लग्न काही दिवसांवर होती. यातील परमजीत त्याच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता आणि दुसऱ्या दिवशी त्याचे लग्न होणार होते. कुटुंब लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. त्यामुळे लग्नापूर्वी चारही तरुणांनी हरिद्वारमध्ये पवित्र स्नान करण्याचे ठरवले. परंतु रात्री उशिरा झालेल्या रस्ते अपघातात चौघांचाही मृत्यू झाला. या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com