Mumbai Rent Rules: मुंबईकरांच्या कामाची बातमी! घर भाड्याने देण्यापूर्वी हे काम कराच अन्यथा ₹५००० दंड भरा

Maharashtra Government Mumbai Rent Rules Changed: महाराष्ट्र सरकारने घर भाड्याने देण्याच्या नियमात बदल केला आहे. आता घरमालक आणि भाडेकरुंना ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.
Mumbai Rent Rules
Mumbai Rent RulesSaam Tv
Published On
Summary

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबईत घर भाड्याने देण्याच्या नियमात बदल

घरमालक आणि भाडेकरुंना ऑनलाइन नोंदणी अनिवार्य

मुंबईला स्वप्नांचे शहर म्हणतात. मुंबईत येऊन अनेकांची स्वप्ने पूर्ण होतात, असं म्हणतात. गावाखेड्यातून लोक शिक्षणासाठी, नोकरीसाठी मुंबईत येतात. मुंबईत आल्यावर सुरुवातीला स्वतः चे घर घेणे हे परवडणारे नाही. त्यामुळे अनेकजण भाड्याने राहतात. दरम्यान, आता महाराष्ट्र सरकारने भाडेकरुंसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत घरमालक आणि भाडेकरु यांच्यासोबत स्टॅम्प करार केला जायचा. दरम्यान, या नियमांमध्ये आता बदल करण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरातील भाडेकरुंसाठी नवीन नियम लागू केले आहेत.

Mumbai Rent Rules
EPFO New Scheme: EPFO ने लाँच केली नवी योजना! कर्मचाऱ्यांना होणार फायदा; वाचा सविस्तर

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाने भाडे कराराच्या प्रक्रियेत बदल केले आहेत. याबाबत नियम जारी केले आहेत. यानुसार, प्रत्येक भाडे करार (Leave and License) लेखी स्वरूपात असणे आणि त्याची नोंदणी करणे अनिवार्य आहेत. याचाच अर्ज असा की, केवळ स्टॅम्प पेपवरील करार हा कायदेशीररित्या पुरेसा मानला जात नाही, आता प्रत्येक भाडे कराराची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे बंधनकारक आहे.

महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा, १९९९ अंतर्गत ही नोंदणी करणे आवश्यक आहे. दरम्यान, जर तुम्ही नोंदणीकृत करार केला नाही तर मालकाला ५००० रुपये दंड किंवा तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असं नियमांमध्ये म्हटलं आहे. यामुळे तुम्हाला आता भाडे करार ऑनलाइन पद्धतीने रजिस्टर करावा लागणार आहे. भाडेकरु आणि घरमालक यांच्यामधील व्यव्हार अधिक पारदर्शक होण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.

Mumbai Rent Rules
Ladki Bahin Yojana: दीड कोटी लाडक्या अपात्र ठरणार? केवळ 80 लाख लाभार्थ्यांचंच e-KYC पूर्ण

भाडे करार नियमात काय बदल झाले? (Rent Rules Changed)

भाडे करार ऑनलाइन नोंदणी आवश्यक

स्टॅम्प पेपरवरील करार वैध नाही

निवासी घरांची अनामत रक्कम तीन महिने तर व्यावसायिक करासाठी सहा महिने भाड्याइतकी ठेवता येणार

ऑनलाइन नोंदणीसाठी १९ महिन्यांचा भाडे करार आवश्यक असून डिजिटल शिक्का अनिवार्य

भाडे करार ऑनलाइन नोंदणी केली नाही तर ५ हजार रुपयांचा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा

Mumbai Rent Rules
Maharashtra Weather Update : पुणे महाबळेश्वरपेक्षा थंड, धुळ्यात पारा ८.६ अंशावर; राज्यात थंडीची जोरदार एंट्री

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com