Mumbai-Pune Railway Line Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Distance: मुंबई-पुणे रेल्वे प्रवास सुसाट होणार, प्रवाशांचा एक तास वाचणार; कसं ते पाहा

Mumbai-Pune Railway Line: मुंबई-पुणे असा रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्याचा रेल्वे प्रवास आता तब्बल १ तासांनी कमी होणार आहे. कसा ते वाचा सविस्तर...

Priya More

मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबई-पुणे रेल्वे प्रवास आणखी सुसाट होणार आहे. मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांचा रेल्वे प्रवास अधिक वेगात व्हावा यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडण्यासाठी आणि लोणावळा घाटातील प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी कर्जत ते तळेगाव आणि कर्जत ते कामशेत हे दोन नवे मार्ग तयार करण्यासाठीचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून तयार करण्यात आला आहे.

नव्या मार्गामुळे लोणवळा-खंडाळा घाट वगळणार -

या नव्या मार्गामुळे मेल आणि एक्स्प्रेस लोणावळा घाटातून न जाता थेट पुण्याला पोहचू शकणार आहेत. महत्वाचे म्हणजे या नव्या मार्गामुळे रेल्वेचा वेग देखील वाढणार आहे. त्याचसोबत मध्य रेल्वेला मुंबई-पुणे या मार्गावर जास्त रेल्वे गाड्या चालवणे शक्य होणार आहे. मुंबई-पुणे नव्या रेल्वे मार्गामुळे प्रवासाच्या वेळेमध्ये देखील बचत होणार आहे. या रेल्वे प्रवासाच्या वेळेत एक तासाची बचत होणार आहे. म्हणजे जर मुंबईवरून पुण्याला पोहचायला तुम्हाला ३ तास लागत असतील तर नव्या मार्गामुळे फक्त दोन तासांत पुण्यामध्ये पोहचता येणार आहे.

रेल्वे-एक्स्प्रेसचा वेग वाढणार -

मुंबई ते पुणे रेल्वे मार्गातून प्रवास करताना लोणावळा-खंडाळा घाट लागतो. हा घाट ओलांडूनच मुंबई किंवा पुण्यामध्ये आपण पोहचतो. प्रवासी सुरक्षिततेमुळे या घाटातून प्रवास करताना मेल-एक्स्प्रेसला ६० कि.मी अशी वेगमर्यादा आहे. लोणावळा- खंडाळा घाटात जाण्यापूर्वी किंवा घाट उतरल्यानंतर कर्जत रेल्वे स्थानकावर मेल-एक्स्प्रेसला बँकर म्हणजेच अतिरिक्त इंजिन जोडले जाते. बँकर जोडण्यासाठी २० ते २५ मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामुळे मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवासी वेळ वाढतो. याच प्रवासाची वेळ कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने नवीन मार्गासाठी चाचपणी सुरू केली आहे. नवा मार्ग सुरू झाला तर या मार्गावरून रेल्वे आणि एक्स्प्रेस ताशी ११० कि.मी वेगावे धावू शकणार आहेत.

नव्या मार्गाचा काय फायदा होणार?

नव्या मुंबई-पुणे रेल्वे मार्गामुळे प्रवासाची वेळ कमी होणार आहे. मुंबई ते पुणे या घाटातील चढ-उतार, वळणे कमी होतील म्हणजेच गाडी सुसाट जाईल. मेल आणि एक्स्प्रेसचा वेग वाढेल. त्याचसोबत मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे गाड्यांची संख्या वाढेल. या प्रोजेक्टसाठी खर्च देखील खूपच जास्त लागणार आहे. कर्जत ते तळेगाव या नव्या मार्गासाठी १६ हजार कोटी आणि कर्जत ते कामशेत या मार्गासाठी १०,२०० कोटी रुपयांचा खर्च लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का?  'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

Samosa Recipe: घरच्या घरी नाश्त्याला बनवा खुसखुशीत समोसा; बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे द्याल सोडून

Maharashtra Politcs : निकालाच्या आदल्या दिवशी भाजपला मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्याने हाती धरली उद्धव ठाकरेंची मशाल

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

SCROLL FOR NEXT