मावळ : खंडाळा बोर घाटात जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर राजमाची पॉईंट येथील खंडाळा महामार्ग पोलीस चौकी समोर पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास एका डस्टर कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने या गाडीत बसलेल्या दोन महिला आणि एक व्यक्ती गाडीने पुर्ण पेट घेण्यापूर्वीच बाहेर पडले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
मुंबईकडून तिघेजण करणे पिंपरी जाण्यासाठी निघाले होते. या दरम्यान (Khandala) खंडाळा जवळील घाट चढून पार केल्यानंतर गाडीच्या इंजिनमधून क्लचप्लेट जळल्यासारखा वास येऊ लागला. यामुळे कर चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला घेत थांबविली. यानंतर तिघेजण गाडीच्या खाली उतरताच अचानक गाडीने पेट घेतला. पाहताक्षणी कारचा मोठा भडका (Burning car) उडाला. गाडीतून तिघेजण खाली उतरल्यामुळे मोठी दुर्घटना टाळली आहे.
कारला आग लागल्याची घटना समजताच आयआरबीच्या अग्निशमन दल (Fire Brigade) घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गाडीची आग विझवली. या घटनेनंतर महामार्ग पोलिसांनी वाहन चालकांना वेगमर्यादा पाळण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान या आगीचे व्हिडिओ पोलीस यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.