Rabbi crop Insurance
Rabbi crop InsuranceSaam tv

Rabbi crop Insurance : रब्बी हंगामातील नुकसानीपोटी पीक विम्याची रक्कम द्या; स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन

Washim News : वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये जानेवारी ते एप्रिल महिन्या दरम्यान गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता, यात हरभरा, गहू, तूर आणि कपाशी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते
Published on

मनोज जयस्वाल 

वाशीम : रब्बी हंगामात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटमध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम २०२३-२४ मधील पिक विमा रक्कम मिळावी; या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यास सुरवात करण्यात आली आहे. 

Rabbi crop Insurance
Kalyan Crime News : मुलाच्या कॉलेजची फी भरण्यासाठी चोरीचा मार्ग; चोरी करणारी महिला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

वाशिम (Washim) जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये जानेवारी ते एप्रिल महिन्या दरम्यान गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता, यात हरभरा, गहू, तूर आणि कपाशी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होऊन ही पीकविमा कंपनीकडून अद्याप पर्यंत पीक विमा (Crop Insurance) मजूर करण्यात आला नाही. यात खरीप हंगामात देखील पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

Rabbi crop Insurance
Pimpri Chinchwad News : रवी राणा यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून आंदोलन; लाडकी बहीण योजनेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्याचा केला निषेध

दरम्यान वाशीम जिल्ह्याच्या शेजारील बुलढाणा जिल्ह्यामध्ये सरसकट पिकविमा देण्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Mundhe) यांनी मंजूर केले असून त्याच धर्तीवर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा सरसकट रब्बीचा पिक विमा मंजूर करण्यात यावा. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com