Kalyan Crime News : मुलाच्या कॉलेजची फी भरण्यासाठी चोरीचा मार्ग; चोरी करणारी महिला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Kalyan News : काही वर्षांपूर्वी राणीच्या पतीने तिला सोडून दुसरे लग्न केले. त्यानंतर चार मुलांचा उदरनिर्वाह कसा करायचा, त्यांना कसे सांभाळायचे या विवंचनेत ती होती. यातूनच तिने चोरीचा मार्ग पत्करला.
Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaam tv
Published On

अभिजीत देशमुख
कल्याण
: धावत्या लोकलमध्ये महिलेची चैन हिसकावणाऱ्या एका महिलेला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस तपासा दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली असून महिलेला तिच्या नवऱ्याने सोडून दुसरे लग्न केले. यामुळे संसार उघड्यावर पडला. चार मुलांची जबाबदारी असल्याने हाताला मिळेल ते काम ती करत होती. तरी देखील पैशांची चणचण भासत असल्याने चोरीचा मार्ग पत्करला. त्यातच तिला आजारपण जडले. उपचारासाठी तिने मुंबई गाठली. मात्र मुलाच्या कॉलेजची फी भरायची असल्याने तिने पुन्हा धावत्या लोकलमध्ये एका महिलेची चैन हिसकावली आणि ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली.

Kalyan Crime News
Nanded News : आमदार बालाजी कल्याणकरांना मराठा आंदोलकांचा घेराव; रस्ता अडवत विचारला जाब

छत्रपती संभाजीनगर येथे राहणाऱ्या राणी भोसले असे रेल्वे पोलिसांनी (Railway Police) ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. राणी भोसले हिला तीन मुलं आणि एक मुलगी आहे. काही वर्षांपूर्वी राणीच्या पतीने तिला सोडून दुसरे लग्न केले. त्यानंतर चार मुलांचा उदरनिर्वाह कसा करायचा, त्यांना कसे सांभाळायचे या विवंचनेत ती होती. यातूनच तिने चोरीचा मार्ग पत्करला. या दरम्यान तिने हाताला मिळेल ते काम देखील केले. याच दरम्यान राणीला आजार झाला. आजारावर उपचार करण्यासाठी (Kalyan) तिच्याकडे पैसे नव्हते. म्हणून ती मुंबईला आली. कल्याण येथे विठ्ठलवाडी परिसरात राहणाऱ्या आपल्या भावाकडे आली. तिला उपचारासाठी औषध घेण्यासाठी मुंबई येथे ग्रँड रोडला जायचे होते. दरम्यान १० ऑगस्टला ती ग्रँट रोडला गेली. या दरम्यान बारावीत शिकणाऱ्या तिच्या मुलाने फोन करत कॉलेजमध्ये फी भरन्यासाठी पैसे हवे असे सांगितले. त्यामुळे राणी चिंतेत होती. पैशांची गरज असल्याने तिने चोरी करण्याचा निर्णय घेतला. 

Kalyan Crime News
Bhamchandra Dongar : संत तुकाराम महाराजांच्या तपोभूमीला भूमाफियांचा विळखा; भामचंद्र डोंगर मुक्तीचा पुन्हा एकदा एल्गार

सीसीटीव्हीच्या आधारे शोध 

कल्याण- शहाड दरम्यान गर्दीचा फायदा घेत तिने लोकलमध्ये एका महिलेची चैन हिसकावली. तिथून राणी कल्याणला आली व कल्याणहुन विठ्ठलवाडीला निघून गेली. महागडी चैन चोरी झाल्यानंतर महिलेने कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता यामध्ये तोंडाला स्कार्फ घातलेली एक महिला आढळून आली. पोलिसांना या महिलेवर संशय बळावला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या महिलेचा शोध सुरू केला. महिला विठ्ठलवाडी स्टेशनला उतरली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. विठ्ठलवाडी परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस तिच्या घरापर्यंत पोहोचले. पोलीस कर्मचारी लक्ष्मण कुटे यांच्या पथकाने या महिलेला अटक केली. या दरम्यान चोरी केलेले दागिने हस्तगत करण्यात आले. राणी विरोधात सहा ते सात गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com