संजय सूर्यवंशी
नांदेड : नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. आमदार बालाजी कल्याणकर यांना उत्तर नांदेड मतदार संघातील सोमेश्वर येथे मराठा आंदोलकांनी अडवले. तसेच याठिकाणी आमदारांना घेराव घालत मराठा आरक्षण देण्याबाबत जाब विचारला.
सध्या मराठा आंदोलक अनेक नेत्यांना अडवून जाब विचारात आहेत. भोकर विधानसभा मतदार संघात भाजपाचे खासदार अशोक चव्हाण त्यांच्या पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण आणि कन्या श्रीजया चव्हाण यांना देखील (Maratha Aarkshan) मराठा आंदोलकांनी अडवून जाब विचारला होता. त्यानंतर नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील नांदेडमध्ये मराठा आंदोलकांनी विरोध केला होता. दरम्यान काँग्रेस पक्षाच्या विभागीय बैठकीत मराठा आंदोलकांनी घुसून प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला जाब विचारला होता आणि आज शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना देखील मराठा आंदोलकांच्या रोषाला समोर जावं लागलं आहे.
नांदेड (Nanded) उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे सोमेश्वर येथे विकास कामाच्या उद्घाटनासाठी आले होते. या कार्यक्रमावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना अडवून घेराव घालत जाब विचारला. मराठा आरक्षण, सगेसोयरे अमंबजावणीच काय झाले. तूम्ही सत्ताधारी आहात, वाशीमध्ये सरकारने समाजाला दिलेल्या आश्वासनाचे काय झाले; याबाबतर मराठा आंदोलकांनी विचारणा केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.