Beed Vidhan Sabha : बीड विधानसभा मतदार संघात महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच; शिंदे गटाकडून अनिल जगताप ठाम

Beed News : आगामी येत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे.
Beed Vidhan Sabha
Beed Vidhan SabhaSaam tv
Published On

बीड : बीड विधानसभा मतदार संघात महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. भाजपा पाठोपाठ आता शिंदे गटाने देखील बीड विधानसभा मतदार संघावर दावा केला आहे. शिंदे गटाकडून जिल्हा प्रमुख अनिल जगताप निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीड विधानसभेची जागा महायुतीतून घेणार असल्याचं जगताप यांनी सांगितले.

Beed Vidhan Sabha
Parbhani News : पावणेसात लाख शेतकऱ्यांना मिळणार ५ हजारांचे अनुदान; कापूस- सोयाबीन ई-पीक पेरा नोंदणी आवश्यक


आगामी येत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. महायुती व महाविकास आघाडी कडून मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे. यात (Beed) बीड विधानसभा मतदार संघावर शरद पवार गटाचे वर्चस्व असून सध्या संदीप क्षीरसागर हे आमदार आहेत. मात्र या जागेवर महायुतीतील (BJP) भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्यात रस्सीखेच सुरु असल्याचे पाहण्यास मिळत आहे. येथे शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांकडून दावा करण्यात येत आहे. 

Beed Vidhan Sabha
School Uniform : दोन महिन्यानंतरही गणवेशाचे कापडच मिळेना; स्वातंत्र्य दिनी विद्यार्थ्यांना जुनाच गणवेश

भाजपा आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) युतीत बीड विधानसभेची जागा ही शिवसेनेला मिळालेली आहे. त्यामुळे आता याच जागेवर शिंदे गट दावा करत आहे. जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी बीड विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार केलाय. त्यामुळे येणाऱ्या दिवसात महायुतीत बीड विधानसभा मतदार संघात जागावाटपाचे आव्हान असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com