School Uniform : दोन महिन्यानंतरही गणवेशाचे कापडच मिळेना; स्वातंत्र्य दिनी विद्यार्थ्यांना जुनाच गणवेश

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील २ लाख १० हजार ३०७ विद्यार्थी हे गणवेशासाठी पात्र झाले आहेत.
sambhajinagar News
sambhajinagar NewsSaam tv
Published On

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तरी देखील काही दिवसांवर येऊन ठेपलेला स्वतंत्र दिन विद्यार्थ्यांना विना गणवेशाचाच साजरा करावा लागणार आहे. हे चित्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील आहे. 

sambhajinagar News
Parbhani News : पावणेसात लाख शेतकऱ्यांना मिळणार ५ हजारांचे अनुदान; कापूस- सोयाबीन ई-पीक पेरा नोंदणी आवश्यक

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील २ लाख १० हजार ३०७ विद्यार्थी हे गणवेशासाठी पात्र झाले आहेत. मात्र अजूनही ते गणवेश मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. (Zp School) जिल्हा परिषदेच्या २ हजार ८० शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशासह बूट आणि पाय मोजे देण्याचे नियोजन आहे. राज्य शासनाने एक राज्य एक गणवेश योजनेनुसार प्रति विद्यार्थी दोन गणवेश देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शासनाने ठरवलेल्या नियोजनानुसार अद्याप पर्यंत कोणत्याही शाळेत गणवेश उपलब्ध झालेले नाही. 

sambhajinagar News
Gram Panchayat Scam : चांडोल ग्रामपंचायतीच्या विकास कामात अडीच कोटींचा घोटाळा; राज्य मुख्य सचिवाकडे केली न्यायाची मागणी

एका विद्यार्थ्याला (Student) दोन गणवेश देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यातील एका गणवेशाचे कापड हे महिला आर्थिक विकास महामंडळाकडे पाठवून बचत गटाच्या माध्यमातून शिलाई करण्यात येत आहे. ३० ऑगस्टपर्यंत गणवेशाचा शिलाईचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या स्वातंत्र्य दिन हा विद्यार्थ्यांना विना गणवेशाचा साजरा करावा लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com