Gram Panchayat Scam : चांडोल ग्रामपंचायतीच्या विकास कामात अडीच कोटींचा घोटाळा; राज्य मुख्य सचिवाकडे केली न्यायाची मागणी

Buldhana News : बुलढाणा तालुक्यातील चांडोल ग्रामपंचायतीसाठी मिळालेला १४ वित्त आयोगाचा निधी गावातील जलजीवन मिशनचे कामे, रस्ते, पूल नाल्या आदी विकासाचे व मूलभूत सुविधाचे कामांकरिता वापरायचा होता
Gram Panchayat Scam
Gram Panchayat ScamSaam tv
Published On

बुलढाणा : बुलढाणा तालुक्यातील चांडोल ग्रामपंचायतीला १४ वित्त आयोगाचा कोट्यावधीचा निधी प्राप्त झाला होता. मात्र या निधीत कोणत्याही प्रकरणी विकास कामे न करता संपूर्ण निधी काढून घेत घोटाळा करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. हा घोटाळा  एका नागरिकाने केलेल्या चौकशीत समोर आला आहे. या प्रकरणी आता राज्याच्या मुख्य सचिवांकडे न्यायाची मागणी करण्यात आली आहे. 

Gram Panchayat Scam
Ajit Pawar Security : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवाला धोका? पोलिसांनी वाढवली सुरक्षा, पाहा VIDEO

बुलढाणा (Buldhana) तालुक्यातील चांडोल ग्रामपंचायतीसाठी मिळालेला १४ वित्त आयोगाचा निधी गावातील जलजीवन मिशनचे कामे, रस्ते, पूल नाल्या आदी विकासाचे व मूलभूत सुविधाचे कामांकरिता वापरायचा होता. मात्र प्रत्यक्षात कामे कुठेच झाल्याचे दिसत नसल्याने स्थानिक नागरिकाने कसून चौकशी केली. यात (Gram Panchayat) काम करणारी यंत्रणा ही बोगस दाखवून व कुठलेही विकास कामे न करता पूर्णतः बिले काढून गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक दुर्गाप्रसाद चांदा यांनी ऑनलाईन काढलेल्या पुरव्यावरून केला आहे. त्याची तक्रार जिल्हाधिकारी व अमरावती आयुक्त यांच्याकडे केली असून जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे सुनावणी करण्यासाठी वर्ग केले आहे.

Gram Panchayat Scam
Ahmednagar News : अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न, दोघेही पुण्यात नोकरीला; नवदाम्पत्य गावाकडं आलं अन् विपरीत घडलं

याबाबत (Zilha Parishad) जिल्हा परिषद व पंचायत समितुकडे विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे चांडोल गावातील विकासात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याने जिल्हा व विभागात न्याय मिळत नसल्याने दुर्गाप्रसाद चांदा यांनी आता राज्याच्या मुख्य सचिवाकडे न्यायाची मागणी केली आहे. तसे पत्र व झालेल्या भ्रष्टाचाराचे पुरव्यासह राज्याच्या मुख्य सचिवाकडे पाठविण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com