Sangli Crime News : महिलेला मारहाण करून जबरी चोरी, दागिने केले लंपास; पलूस तालुक्यातील घटना

Sangli News : घरामध्ये इतर कोणीही नसल्याचा कानोसा घेत चोरटे त्यांच्या घरासमोर आले. बाजूलाच असलेल्या शाळेत प्रार्थना चालू असल्याची संधी साधत दोन ते तीन चोरटे घरामध्ये घुसले.
Sangli Crime News
Sangli Crime NewsSaam tv
Published On

सांगली : सांगलीच्या पलूस तालुक्यातील धनगाव येथे चोरट्यांनी घरात घुसून जबरी चोरी केल्याची घटना घडली आहे. या घटनेत चोरटयांनी महिलेला बेदम मारहाण करत अंगावरील दागिने जबरदस्तीने हिसकावून पलायन केले. या चोरट्यांच्या हल्ल्यात उषा निखिल कोळी ही महिला जखमी झाली असून त्याना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

Sangli Crime News
School Uniform : दोन महिन्यानंतरही गणवेशाचे कापडच मिळेना; स्वातंत्र्य दिनी विद्यार्थ्यांना जुनाच गणवेश

सांगली (sangli) जिल्ह्यातील धनगाव या गावात वास्तव्यास असलेल्या उषा निखिल कोळी या घरातील बाथरूममध्ये कपडे धूत होत्या. यावेळी घरामध्ये इतर कोणीही नसल्याचा कानोसा घेत चोरटे त्यांच्या घरासमोर आले. बाजूलाच असलेल्या शाळेत प्रार्थना चालू असल्याची संधी साधत दोन ते तीन चोरटे घरामध्ये घुसले. चोरट्यांनी उषा कोळी यांच्या अंगावरील दागिने हिसकावण्याच्या प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने उषा कोळी या घाबरल्या होत्या. त्यांनी आरडाओरडा करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. (Crime News) तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या तोंडावर रॉड मारून गंभीर जखमी केले. तसेच बेदम मारहाण करत अंगावरील दागिने हिसकावून घेतले. 

Sangli Crime News
Beed Vidhan Sabha : बीड विधानसभा मतदार संघात महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच; शिंदे गटाकडून अनिल जगताप ठाम

नागरिकांची गस्त तरीही चोरट्यांनी साधला डाव 

त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या हिसकावण्याचा प्रयत्न करू लागले. बांगड्या निघत नसल्याने कोळी यांच्या हाताला धरून घरातून दरवाजापर्यंत फरफटत आणले. या झटापटीत कोळी या रक्तबंबाळ झाल्या. चोरट्यांचा धुमाकूळ मागील पंधरा दिवसांपासून या परिसरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर गावामध्ये नागरिक गस्त घालत आहेत. तरी सुद्धा चोरट्यांनी धनगाव येथे घरात घुसून महिलेला जबर मारहाण करून ऐवज लुटल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com