Pimpri Chinchwad News : रवी राणा यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून आंदोलन; लाडकी बहीण योजनेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्याचा केला निषेध

Pimpri chinchwad : लाडकी बहिण योजनेला आमचा विरोध नाही, मात्र तुम्ही जर महिलांना धमकी वजा इशारा देत असाल तर ते आम्ही कदापी खपवून घेणार नाहील असा इशाराच दिला
Pimpri Chinchwad News
Pimpri Chinchwad NewsSaam tv
Published On

पिंपरी चिंचवड : बडनेरा विधानसभेचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेतील निधी बाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आमदार राणा यांच्या या विधानाचा राज्यभरात ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. त्यानुसार या विधाना विरोधात पिंपरी- चिंचवड शहरात शिवसेना ठाकरे गटातील महिलांनी आक्रमक होऊन तीव्र आंदोलन केलं आहे.

Pimpri Chinchwad News
Bhamchandra Dongar : संत तुकाराम महाराजांच्या तपोभूमीला भूमाफियांचा विळखा; भामचंद्र डोंगर मुक्तीचा पुन्हा एकदा एल्गार

बडनेरा विधानसभेचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर आम्ही लाडकी बहिणी योजनेचे पैसे दुप्पट करू, नाहीतर ही योजना कायमस्वरूपी बंद करू..! असा धमकी वजा इशारा रवी राणा यांनी आपल्या भाषणा दरम्यान महिलांना दिला होता. या विधानाचा निषेध शिवसेना ठाकरे गटातील (Thackeray Group) महिलांनी केला आहे. लाडकी बहिण योजनेला आमचा विरोध नाही, मात्र तुम्ही जर  महिलांना धमकी वजा इशारा देत असाल तर ते आम्ही कदापी खपवून घेणार नाहील असा इशाराच दिला आहे.

Pimpri Chinchwad News
Kalyan Crime News : मुलाच्या कॉलेजची फी भरण्यासाठी चोरीचा मार्ग; चोरी करणारी महिला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

आपल्या लाडक्या बहिणीला धमकी देणारा भाऊ, हा लाडका भाऊ नसून बहिणीची ओवाळणी खाणारा भाऊ आहे. असा संताप यावेळी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या महिलांनी महायुती सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार रवी राणा यांचा पुतळा पायदळी तुडवत निषेध केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com