Lonavala News : धोकादायक पर्यटन करणाऱ्या १२ जणांवर गुन्हा; लोणावळा पोलिसांची कारवाई

maval News : राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी धोकेदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान लोणावळ्यात काही दिवसांपूर्वी पाच पर्यटक धबधब्याच्या पाण्यात वाहून गेले होते.
Lonavala News
Lonavala NewsSaam tv
Published On

मावळ : लोणावळ्यात काही दिवसापूर्वी धबधब्याच्या पाण्यात वाहून गेल्याने पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता प्रशासन खडबडून जागे झाले आहे. अशाच प्रकारे धोकादायक पर्यटन करणाऱ्या १२ जणांवर लोणावळा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. यामुळे पर्यटनासाठी जाणाऱ्यांना आता वचक बसणार आहे. 

Lonavala News
Jalgaon Accident : कारवरील नियंत्रण सुटून झाडावर धडकली; तरुणाचा मृत्यू, तीनजण जखमी

राज्यात सध्या जोरदार पाऊस (Rain) सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी धोकेदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान लोणावळ्यात काही दिवसांपूर्वी पाच पर्यटक धबधब्याच्या पाण्यात वाहून गेले होते. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी धोकादायक पर्यटनस्थळी जाण्याच्या संदर्भात बंदीचा आदेश लागू केला होता. हा आदेश झुगारल्याचा ठपका ठेवत १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Lonavala) लोणावळ्यातील सहारा पुलाच्या समोरील डोंगरावर असलेल्या धबधबाच्या मागील बाजूस धोकादायकपणे डोंगरात फिरणाऱ्या ७ पर्यटकांवर तसेच टायगर पॉईंटवर हुल्लडबाजी करणाऱ्या ५ असे एकूण १२ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

Lonavala News
Nanded News : दूषित पाणी प्यायल्याने आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना त्रास; शाळा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

दोन दिवसांपासून जोरदार पाऊस 

दरम्यान शनिवारपासून लोणावळा परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने धबधबे मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाले आहेत. (Lonavala Police) सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस व वन विभाग यांची संयुक्त कारवाई गस्त घालत असताना या १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाच्या या कारवाईमुळे आता पर्यटनासाठी येणाऱ्यांवर निश्चितच वचक बसणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com