Mumbai Pune New Highway Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Pune New Highway : मुंबई-पुणे प्रवास सुसाट होणार, तिसऱ्या महामार्गाबाबत मोठी अपडेट, वाचा कसा असणार एक्सप्रेस वे?

Mumbai Pune New Highway: मुंबई पुण्यासाठी आता तिसरा महामार्ग प्रस्तावित आहे. अटल सेतू ते कर्जत चौक हा पहिला टप्पा असणार आहे. या मार्गामुळे प्रवास आणखी सोपा आणि सुखकर होणार आहे.

Siddhi Hande

मुंबई पुण्यासाठी आणखी एक महामार्ग

पागोटे (अटल सेतू) ते चौक (कर्जत) पहिला टप्पा

मिसिंग लिंक आणि जुन्या महामार्गाला जोडणार

मुंबई पुणेदरम्यान आता आणखी एक महामार्ग प्रस्तावित आहे. मुंबई पुणेदरम्यान तिसरा महामार्ग सुरु केला जाणार आहे. नवीन द्रुतगती मार्गाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुढच्या महिन्याभरता या महामार्गाचे भूमिपूजन करुन त्याचे काम सुरु होणार आहे. पहिल्या टप्प्यात अटल सेतू ते कर्जत चौकापर्यंतचे काम केले जाणार आहे. नवीन मार्गाची पुन्हा आखणी केली जाणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागच्या वर्षी मुंबई-बंगळुरु एक्सप्रेस वेची घोषणा केली होती. मुंबई पुणे महामार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी असते. त्यामुळे नवीन रस्ता तयार केला जात आहे. नवीन बंगळुरु द्रुतगती रस्त्याचा एक भाग मुंबई पुणेदरम्यान आहे. त्यामुळे मुंबई पुणेदरम्यानच्या रस्त्याचे काम प्राधान्याने व्हावे, यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. यातूनच पागोटे (अटल सेतू) ते चौक (कर्जत) या टप्प्याचे काम सुरु केले जाणार आहे.

चौक (कर्जत) ते शिवरे (खेड शिवापूर) या प्रकल्पासाठी मान्यता दिली असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या मार्गावरच्या भूसंपादनाचा विषय मार्गी लागला आहे. हा रस्ता आठपदरी केला जाणार असून भविष्यात सोळा पदरीदेखील केला जाऊ शकतो. यासाठी १०० मीटर जागा संपादित केली जाणार आहे.

या नवीन मार्गासाठी लोणावळा ते खोपोलीदरम्यान नवीन रस्ता तयार करणार आहे. यामध्ये बोगदा आणि उड्डाणपूल असणार आहे. मिसिंग लिंक आणि जुन्या मुंबई पुणे महामार्ग भागात हा रस्ता उपलब्ध होणार आहे.

हा नवीन मार्ग लोणावळ्यातून पवना खोऱ्यातून मुळशीमार्गे खेड शिवापूरला जाणार आहे. येथील शिवरे गावातील रिंग रोडला जोडणार आहे. यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूरकडे जाणाऱ्यांसाठीही हा रस्ता उपयुक्त ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT