Thane Amne Samruddhi Connector : नागपूरहून मुंबई जोडणारा समृद्धी महामार्ग हा 'आमणे' (भिवंडीजवळ) येथे संपतो. पण तिथून पुढे मुंबई किंवा ठाण्याला पोहचताना प्रचंड वाहतूक कोंडी होते. हीच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आमणे ते ठाणे (साकेत) असा एक नवीन मार्ग बनवण्याचा निर्णय MMRDA ने घेतला आहे. पण त्याआधीच लोट आकारणीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. आमणे ते ठाणे या मार्गावर प्रवासी गाड्यांसाठी १०० रुपयांची टोल आकारणी प्रस्तावित करण्यात आली आहे. दरवर्षी या शुल्कात पाच टक्क्यांची वाढ करण्यात यावी, अशी सूचनाही एमएमआरडीएकडून कऱण्या आली आहे. त्यामुळे ‘समृद्धी’च्या या पोहच मार्गावर प्रवाशांना टोल भरवा लागू शकतो. ( Amne to Thane Samruddhi connector toll details)
आमणे ते ठाणे या पोहच मार्गाचा प्रस्तावित खर्च ६७४२ कोटी रूपये इतका आहे. त्यामध्ये बांधकाम किंमत, जमीन अधिग्रहणाचा खर्च तसेच सर्वप्रकारचे कर आणि दरवाढ याचा समावेश आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि भिवंडी परिसरात होणारी ट्रॅफिकची कटकट या नवीन मार्गामुळे कमी होईल. या रस्त्याचा खर्च वसूल करण्यासाठी यावर 'टोल' (पथकर) लावण्याचा प्रस्ताव आहे. साध्या कारसाठी साधारण १०० रुपये टोल असू शकतो. विशेष म्हणजे, दरवर्षी या टोलमध्ये ५ टक्क्यांनी वाढ करण्याचीही योजना आहे.
सध्या समृद्धी महामार्गावरून वेगाने आल्यावर आमणे ते ठाणे या भागात गोदामांमुळे आणि अवजड गाड्यांमुळे प्रवाशांना दोन दोन तास ट्रॅफिकमध्ये अडकावे लागते. हा नवा मार्ग झाल्यास समृद्धी महामार्गाने मुंबईपर्यंत वेगाने पोहचता येणार आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण आणि डोंबिवली ही शहरे अतिशय झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. ठाणे, अंजूर, भिवंडी ते अगदी पडघ्यापर्यत मोठया प्रमाणावर गोदामांची संख्या आहे. त्यामुळे अवजड वाहतूकीमुळे हा संपूर्ण परिसर वाहतूक कोंडीत सापडला आहे. त्यामुळेच समृद्धीला जोड रस्ता तयार करण्याचा प्लान आखला आहे. ठाणे ते आमणे हा सहा पदरी रस्ता तयार केला जाणार आहे. हा मार्ग ठाण्यातील आनंदनगर-साकेत उन्नत मार्गास जोडणीद्वारे प्रस्तावित करण्यात आलाय. तसेच हा मार्ग राजनौली जंक्शनपर्यत उन्नत आणि पुढे मुंबई-नाशीक महामार्गावर दुभाजक पद्धतीने सोनाळे गावापासून उजवीकडे वळण घेऊन करवली व आमणे गावाजवळ जोडण्याचे प्रस्तावित करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.