Accident : काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, मित्राच्या साखरपुड्याला निघाले, पण ३ मित्रांचा वाटेतच घात

three friends killed in Nawada bike accident : बिहारमधील नवादा जिल्ह्यात मित्राच्या साखरपुड्याला जात असताना दुचाकीचा भीषण अपघात होऊन तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अतिवेगामुळे झालेल्या या अपघाताने गावात शोककळा पसरली आहे.
Accident News
Accident NewsSaam tv
Published On

Bihar road accident : मित्राच्या साखरपुड्याला जाताना काळाने घाला घातला अन् ३ मित्रांचा जागीच मृत्यू झाला. बिहारमधील नवादा जिल्ह्यात दुचाकीच्या भीषण अपघातात ३ तरूणांचा मित्र झाला. मित्राकडे जाताना दुचाकी अतिशय वेगात होती. भरधाव वेगात असणारी बाईक वि‍जेच्या खांबाला जाऊन धडकली. ही धडक इतकी भयंकर होती की ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी तिघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवले आहेत.

बिहारमधील नवादा जिल्ह्यातील सीतामढी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. साखरपुड्याला जाताना दुचाकीचा अपघातात ३ मित्रांचा जागीच मृत्यू झाला. सोनू कुमार उर्फ भोला चौधरी, प्रताप कुमार उर्फ विकास कुमार आणि इंद्र मांझी असे अपघातात मृत्यू झालेल्या मिंत्रांची नावे आहेत. पोलिसांनी तिघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. एका आनंदाच्या समारंभासाठी निघालेल्या या तरुणांच्या मृत्यूमुळे रिऊला गावावर शोककळा पसरली आहे.

Accident News
Unseasonal Rain : राज्यावर अवकाळीचं संकट! ४ जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले, आज कुठे कुठे इशारा?

मृत झालेले तरूण गया जिल्ह्यातील रिऊला गावातील आहेत. हे तीन तरुण एका दुचाकीवरून अकबरपूर ब्लॉकमधील महोगया गावात मित्राच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. पण त्यावेळी काळाने घाला घातला. कटघर वळणाजवळ दुचाकीचा वेग अत्यंत जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या वि‍जेच्या खांबाला जाऊन धडकली. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी (Post-mortem) पाठवले असून मृतांच्या कुटुंबीयांना या घटनेची कल्पना देण्यात आली आहे.

Accident News
Maharashtra budget session : आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, मुख्यमंत्री 6 मार्चला मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, नवादा येथे झालेला हा अपघात इतका भीषण होता की, त्यावरून दुचाकीच्या वेगाचा अंदाज लावता येतो. विजेच्या खांबाला झालेल्या धडकनंतर दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा जागीच अंत झाला. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, सध्या लग्नसराईच्या काळात कार्यक्रमांना जाणारे तरुण मोठ्या प्रमाणात मद्यपान करत आहेत. अनेकदा मद्याच्या नशेत गाडी चालवल्यामुळेच असे गंभीर अपघात घडत असल्याचे बोलले जात आहे.

Accident News
Accident : ४ दिवसापूर्वी साखरपुडा आज काळाने घात केला; धाराशिवमध्ये अक्षय-अक्षयाचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com