Accident : ४ दिवसापूर्वी साखरपुडा आज काळाने घात केला; धाराशिवमध्ये अक्षय-अक्षयाचा मृत्यू

Dharashiv Road accident Death Toll : धाराशिवमध्ये चार दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या अक्षय आणि अक्षया या तरुण जोडप्याचा सोलापूर-धुळे महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू झाला. परीक्षा देण्यासाठी जात असताना टोल कमानीला कार धडकल्याने ही दुर्दैवी घटना घडली.
Dharashiv newly engaged couple accident news
Dharashiv newly engaged couple accident newsSaam TV Marathi
Published On

Dharashiv newly engaged couple accident news : धाराशिवच्या रत्नापूर पाटीजवळ सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर टाटा नेक्सॉन गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दाम्पत्याचा मृत्यू झाला. चार दिवसापूर्वीच अक्षय अन् अक्षया यांचा साखरपुडा झाला होता. पण आज काळाने घाला घातला. रत्नापूर पाटीजवळील वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार कमानीला धडकली. वाशी तालुक्यातील पारा येथील अक्षय रामभाऊ शिनगारे( वय-25) आणि वाशी येथील अक्षया सुनिल चव्हाण (वय 23) अशी मयत नवीन वधू वरांची नावे आहेत. तर या अपघातात कारचालक गंभीर जखमी झालाय. अक्षया हिच्या परिक्षेसाठी दोघे लातूरला निघाले होते. त्यावेळी काळाने घाला घातला.

वाशी तालुक्यातील चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या नवीन नियोजित वरवधूचा सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर रत्नापूर पाटीजवळील वळणावर टोल वेच्या कमानीला कार धडकून झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय आणि इजोरा रहिवाशी हल्ली मुक्काम वाशी येथील सुनील चव्हाण यांची मूलगी अक्षया यांचा गेल्या रविवारी (ता.१५) मांजरसुंबा येथील कन्हेया मंगल कार्यालयात साखरपुडा झाला होता.

Dharashiv newly engaged couple accident news
३ मुलांना विष पाजले, बायकोचा गळा चिरला आणि स्वत:ला गळफास लावला, कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले?

मयत नववधू अक्षया हिची आज लातूर येथे महापारेशनची परीक्षा होती परीक्षा देण्यासाठी वाशी येथून पहाटेच घरची टाटा नेक्सॉन गाडी क्र. एम एच २५ बी एफ ५०६४ गाडीतून जात असताना हा अपघात झाला. रत्नापूर पाटीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट येडशी टोलवेच्या कमानीला धडकली.धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुरडला गेला नववधू अक्षया सुनील चव्हाण (वय.२३) आणि वर मुलगा अक्षय रामभाऊ शिनगारे याचा (वय. २५) अपघातात जागीच मृत्यू झाला.तर चालक अक्षय यादव सिरसट (वय. २२)जखमी झाला आहे.

Dharashiv newly engaged couple accident news
Good News! गोव्यासाठी आणखी एक वंदे भारत होणार सुरू, इतक्या वेळात पोहचणार, वाचा संभाव्य मार्ग

अपघाताची माहिती मिळताच रत्नापूर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले जखमी चालकाला १०८ ला कॉल करुन उपचारासाठी पाठवले.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येरमाळा प्राथमिक रुग्णालयात पाठवला. चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या तरुणीच्या अकाली मृत्यूने वाशी तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Dharashiv newly engaged couple accident news
Accident : भीषण अपघात! ट्रेलरची PCR गाडीला धडक, ५ पोलिसांचा जागीच मृत्यू, ३ जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com