Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, ग्रेड सेपरेटरखाली मोठा कंटेनर अडकला; पाहा VIDEO

Mumbai-Pune Highway Traffic Jam: मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर कंटेनरला अपघात झाला. ग्रेड सेपरेटरमध्ये मोठा कंटेनर अडकला. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

जुन्या पुणे -मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. आज सकाळी एक मोठा कंटेनर या महामार्गावर ग्रेड सेपरेटरमध्ये अडला आहे. मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जाताना मोरवाडी येथील ग्रेड सेपरेटरमध्ये हा कंटेनर अडकला. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. टीसीआय कंपनीचा हा कंटेनर आहे. कंटेनर ग्रेड सेपरेटरमध्ये अडकल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. पिंपरी चिंचवड शहर वाहतूक पोलिसांनी जुन्या मुंबई -पुणे महामार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. कंटेनर काढण्यासाठी वाहतूक पोलिस युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com