Mumbai Politics Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Politics: मुंबईत राज ठाकरेंना धक्का, मनसे नेते संतोष धुरींचा भाजपमध्ये प्रवेश; पक्ष सोडण्यामागचं कारणही सांगितलं

Santosh Dhuri Join BJP: मुंबईत मनसेला मोठा धक्का बसला. मनसेचे नेते संतोष धुरी यांनी राज ठाकरे यांची साथ सोडली. त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचा झेंडा हाती घेतल्यानंतर त्यांनी मनसे पक्ष सोडण्यामागचे कारण सांगितले.

Priya More

Summary -

  • मुंबई पालिका निवडणुकीदरम्यान मनसेला मोठा धक्का

  • संतोष धुरी यांनी भाजपमध्ये केला पक्षप्रवेश

  • जागावाटप आणि तिकीट नाकारल्याने नाराजी

  • भाजपमध्ये प्रवेशानंतर उद्धव ठाकरे आणि मनसेवर केली टीका

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंबईच मनसेला मोठा धक्का बसला. मनसेचे शिलेदार आणि राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या संतोष धुरी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. संतोष धुरी यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आज भाजपचे कमळ हाती घेतले. पालिका निवडणुकीच्या तोंडावर संतोष धुरी यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे यांची भेट घेतली होती. तेव्हापासून ते भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात होते. अखेर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश खरत संतोष धुरी यांनी राज ठाकरे यांना होम ग्राऊंडवर चँलेज दिले आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर संतोष धुरी यांनी मनसेवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मनसे पक्ष सोडण्यामागचे नेमकं काय कारण आहे हे सांगत त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

संतोष धुरी यांनी सांगितले की, 'जागा वाटपाच्या चर्चेत संदीप देशपांडे यांना देखील सहभागी करून घेतलं नाही. उद्धव ठाकरे यांनी आमचे ६ नगरसेवक फोडले होते तेही आम्ही विसरलो. आमच्या नेत्यांना त्रास दिला गेला. उद्धव ठाकरे कोत्या मनाचे आहे. न निवडून येणाऱ्या जागा तिकडे दिल्या तर कसं होणार. मातोश्रीवरून सांगण्यात आले होते की संदीप देशपांडे आणि मी चर्चेत कुठेही नको. कुटुंब एकत्र येण्यासाठी आमचा बळी दिला. संदीप देशपांडे आणि मला तिकीट मिळू नये असा निरोप होता. उद्धव ठाकरे यांनी मनसचे ताबा घेतला. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांसमोर पक्ष सरेंडर केला.'

संतोष धुरी यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला यामागचे मुख्य कारण म्हणजे मसाने आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपावर ते नाराज होते. संतोष धुरी यांना वॉर्ड क्रमांक १९४ मधून तिकीट नाकारण्यात आले होते. जे युतीचा भाग म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार निशिकांत शिंदे यांना देण्यात आले होते. धुरी यांनी यापूर्वी मनसेच्या तिकिटावर या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. परंतू त्यांचा पराभव झाला होता. यावेळी संदीप देशपांडे यांनी संतोष धुरी यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केला होता. पण तरीही त्यांना तिकीट दिले नाही त्यामुळे ते अत्यंत नाराज होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

SCROLL FOR NEXT