BMC Elections : शिवसेना कुणाची? पुन्हा एकदा शिंदे-ठाकरेंमध्ये लढत, ८७ जागांवर होणार आमनासामना

Thackeray vs Shinde BMC election : मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे-मनसे आणि शिंदे-भाजप यांच्यात थेट लढत होत आहे. ८७ जागांवर होणारा सामना बीएमसीचा निकाल ठरवणारा ठरणार आहे.
जनता ठरवणार खरी शिवसेना कुणाची? जनतेच्या कोर्टात शिंदे-ठाकरेंचा निकाल; 69 मतदारसंघांमध्ये दोन्ही गट आमनेसामने
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Saam Tv
Published On

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde BMC Election News : राज्यातील निवडणुकीच्या मैदानात पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने राज्यात बाजी मारली होती. आता बीएमसीमध्ये ठाकरे की शिंदे कोण बाजी मारणार, याची चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे. उद्धव ठाकरेंसोबत यावेळी राज ठाकरेंची मनसे आहे, तर शिंदेंची शिवसेना भाजपसोबत मैदानात उतरली आहे. मुंबई महापालिकेच्या  २२७ जागांसाठी भाजप-शिंदेसेना, ठाकरेसेन-मनसे आणि काँग्रेस-वंचित निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

शिंदे अन् ठाकरेंमध्ये ८७ जागांवर लढत -

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचा सामना उद्धव आणि राज ठाकरे यांच्यासोबत ८७ जागांवर होणार आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना हा सामना मुंबईमध्ये ६९ जागांवर होणार आहे. तर राज ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये १८ जागांवर लढत होणार आहे. या ८७ जागांवरच मुंबई महापालिकेचा निकाल ठरवला जाऊ शकतो, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

जनता ठरवणार खरी शिवसेना कुणाची? जनतेच्या कोर्टात शिंदे-ठाकरेंचा निकाल; 69 मतदारसंघांमध्ये दोन्ही गट आमनेसामने
संभाजीनगर हादरलं! पोलीस कर्मचार्‍याचा निर्घृण खून, मृतदेह घराशेजारीच पुरला

मुंबईमध्ये कोण किती जागांवर लढणार?

काँग्रेस - १६७

शिवसेना ठाकरे- १६३

भाजप - १३७

शिवसेना शिंदे - ९०

राष्ट्रवादी - अजित पवार - ८०

आप - ७५

वंचित - ६०

मनसे - ५३

आरपीआय - ३८

राष्ट्रवादी, शरद पवार - ८

जनता ठरवणार खरी शिवसेना कुणाची? जनतेच्या कोर्टात शिंदे-ठाकरेंचा निकाल; 69 मतदारसंघांमध्ये दोन्ही गट आमनेसामने
भारतात येणार नाहीच, बांगलादेशचं रडगाणं सुरू, ICC काय निर्णय घेणार

विधानसभेत काय झालं होतं?

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईमध्ये ठाकरेंनी बाजी मारली होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत, सेना विरुद्ध सेना लढाई झालेल्या १३ मतदारसंघांपैकी ठाकरेंनी सात जिंकले, तर शिंदे यांच्या पक्षाने ६ जिंकले. मुंबईत ठाकरेंनी लढवलेल्या चारपैकी तीन जागा जिंकल्या होत्या, तर शिंदेंना फक्त एकाच जागेवर विजय मिळवता आला होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंचे मुंबईतील अनेक नेते शिंदेंच्या शिवसेनेत गेले. शिवडी, वरळी, दादर-माहीम, वडाळा, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर (पश्चिम), मागाठाणे, दिंडोशी, दहिसर, वांद्रे (पूर्व) आणि कलिना येथे दे विरुद्ध ठाकरे यांच्या शिवसेनेत लढत होणार आहेत.

जनता ठरवणार खरी शिवसेना कुणाची? जनतेच्या कोर्टात शिंदे-ठाकरेंचा निकाल; 69 मतदारसंघांमध्ये दोन्ही गट आमनेसामने
Dowry harassment: नवऱ्याने दारू पाजली अन् अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले, त्यानंतर....; महिलेच्या आरोपाने पोलिसही चक्रावले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com