Dowry harassment: नवऱ्याने दारू पाजली अन् अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले, त्यानंतर....; महिलेच्या आरोपाने पोलिसही चक्रावले

Domestic violence case : उत्तर प्रदेशातील मथुरामध्ये एका महिलेने नवऱ्यावर दारू पाजून अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवणे, हुंड्यासाठी छळ आणि अमानुष वागणूक दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Crime News
Crime NewsSaam Tv
Published On

नवऱ्याने बळजबरी दारी पाजली. त्यानंतर अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप करत महिला थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहचली. त्या महिलेची तक्रार ऐकल्यानंतर पोलिसही चक्रावले. हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील मथुरामधील आहे. सासरच्या जाचाल कंटाळलेल्या महिलेने पोलीस स्टेशन गाठले अन् तक्रार दाखल केली. नवऱ्याने दारू पाजून अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर खोलीत काहीही उपाशी अन् तहानलेल्या स्थितीतच डांबून ठेवल्याचा आरोप तिने केलाय. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय.

हवा तितका हुंडा दिला नाही, त्यामुळे मागील दोन वर्षांपासून छळ केला जात असल्याची त्करार मथुरेतील महिलेने पोलिसांत केली. सासरच्या लोकांकडून वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जातोय. मला उपाशी ठेवले जाते. पाणीही पिण्यास दिले जात नसल्याचा खळबळजनक आरोप त्या महिलेने केला. नवऱ्याने अनैसर्गिक लैंगिक संबध ठेवल्याचाही आरोप तिने केलाय.

Crime News
Thackeray Brothers : राज ठाकरे १९ वर्षानंतर शिवसेना भवनात जाणार, ठाकरे बंधूंचा आज संयुक्त जाहीरनामा

१० लाखांसाठी छळ -

पोलिसांत दिलेल्या तक्रारीत महिलेने आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराचा पाढा वाचलाय. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी मथुरा येथील एका तरुणाशी तिचे लग्न झाले होते. लग्नात मिळालेल्या हुंड्यामुळे सासरचे लोक नाराज होते. त्या महिलेचा पती, सासरे, सासू, मेहुणे आणि मेहुणी १० लाख रुपयांची मागणी करत होते. तयासाठी तिचा छळ केला जात होता. दररोज शिवीगाळ आणि मारहाण करत होते. तिला उपाशी ठेवत होते. पाणी पिण्यासही देत नव्हते, असे तक्रारीत त्या महिलेने म्हटलेय.

Crime News
पुणे हादरलं! राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या, पत्रात अनेक नावांचा समावेश

हुंड्यासाठी घराबाहेर काढले

त्या महिलेचा नवरा दारू पिऊन घरी यायचा अन् मारायचा. तो तिला जबरदस्तीने दारू पिण्यास भाग पाडत असे. दारू पिण्यास विरोध केला तर मारहाण करायचा आणि अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवायचा. महिलेच्या पालकांनी तिच्या सासरच्या लोकांसोबत पंचायतही केली. पण कोणताही बदल झाला नाही. १९ सप्टेंबर रोजी आरोपीने तिला घराबाहेर हाकलून दिले होते. याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली पण कोणताही कारवाई झाली नव्हती. महिलेने सिनियर पोलिसांकडे याबात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

Crime News
Bhiwandi Rada : घोषणाबाजी दिल्याने राडा, भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले, पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com