पुणे हादरलं! राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या, पत्रात अनेक नावांचा समावेश

Pune man suicide during election campaign : निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. ५६ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या करत सुसाइड नोटमध्ये हडपसरमधील राष्ट्रवादी उमेदवारावर त्रास दिल्याचा आरोप केला आहे.
Hadapsar election controversy
Hadapsar election controversySaam
Published On

Hadapsar candidate harassment suicide allegation : पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडालाय. मतदानासाठी अवघे १० दिवस शिल्लक असल्याने दिवसरात्र एक करून प्रचार केला जातोय. सगळ्याच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असतानाच पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचं समोर आलेय. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे. सादिक उर्फ बाबू कपूर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पुण्यातील हडपसरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ५६ वर्षीय सादिक यांनी हडपसरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार त्रास देत असल्याचा आरोप करत आत्महत्या केलीय. या घटनेनंतर हडपसर आणि पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पोलिसांकडून या आरोपात किती तथ्य आहे? याचा तपास केला जात आहे.

Hadapsar election controversy
Thackeray Brothers : राज ठाकरे १९ वर्षानंतर शिवसेना भवनात जाणार, ठाकरे बंधूंचा आज संयुक्त जाहीरनामा

पुण्यातील लष्कर भागात असलेल्या ऑफीसमध्ये गळफास घेऊन सादिक उर्फ बाबू कपूर यांनी आत्महत्या केली. लष्कर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आत्महत्या कराण्याआधी सादिक कपूर यांनी त्यांच्या हातावर आणि कागदावर सुसाइड नोट लिहिली होती. यामध्ये अनेकांची नावे आहेत. त्यातील एक नाव अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हडपसर भागातील उमेदवार फारुख शेख यांचे आहे. सय्यद नगर भागातील पाच गुंठे जमिनीच्या वादातून ही आत्महत्या झाली असल्याचं प्राथमिक माहिती आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीवर आधी मोका कायद्या अंतर्गत कारवाई झालेली आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे.

Hadapsar election controversy
भाजपाची खरी परीक्षा २०२६ मध्येच! ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक, सध्या कुणाचे आहे सरकार?

पुण्यात प्रचाराचा धुरळा उडणार, राज्यातील बड्या नेत्यांची होणार पुणेवारी

शुक्रवारी पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठीचे चित्र स्पष्ट झाले. त्यानंतर उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली. पुणे महापालिका निवडणुकीत 1165 उमेदवार उभे आहेत. प्रचारासाठी दहा दिवस उरल्यामुळे उमेदवारांकडून पदयात्रा, दुचाकी रॅली पत्रक वाटपाचे काम सुरू करण्यात आले आहे. पुण्यात प्रचाराचा धुरळा उडणार आहे, कारण राज्यातील बड्या नेत्यांची तोफ पुण्यात धडाडणार आहे.

भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बड्या नेत्यांच्या पुण्यात सभा होणार आहेत. सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची पुण्यातील येरवडा मध्ये सभा, तर ११ तारखेला फडणवीस यांचा अनोखा "टॉक शो" आहे. शिंदेसेनेच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ९ तारखेला २ सभा आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सभासत्राला आजपासून सुरुवात होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे , काँग्रेस, उद्धवसेना आणि मनसे यांच्या प्रचारसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मनसेचे प्रमुख राज ठाकरे सुद्धा सभा घेणार आहेत.

Hadapsar election controversy
६५ उमेदवार बिनविरोध? अशी निवडणूक आयुष्यात पाहिली नाही : Raj Thackeray यांचं विधान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com