

मुंबई महानगर पालिका निवडणूक २०२६ साठी ठाकरे बंधू मैदानात उतरले
लालबाग, परळ आणि शिवडीतील शाखांना संयुक्त भेट देणार
जाहीर सभांऐवजी थेट कार्यकर्ता संवादावर भर
शिवडीतील शिवसेनेचा बालेकिल्ला मजबूत करण्याचा प्रयत्न
मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वच पक्षांकडून प्रचाराचा झंझावात सुरू आहे. मुंबई महापालिका पुन्हा जिंकण्यासाठी ठाकरे बंधू देखील मैदानात उतरले आहेत. आज शिवडी विधानसभा मतदारसंघात ठाकरे बंधू एकत्रितपणे दौरा करणार आहेत. शिवडी हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज लालबाग, परळ, शिवडी परिसरातील शाखांना भेट देणार आहेत.
ठाकरे बंधूंनी मुंबईत जास्त जाहीर सभा न घेता थेट शाखा भेटींवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांशी थेट संवाद, संघटनात्मक बांधणी आणि स्थानिक पातळीवरील प्रचार मजबूत करण्यावर ठाकरे बंधूंचा फोकस असल्याची माहिती समोर आली आहे. आज शिवडीतील शाखा क्रमांक २०२, २०३, २०४, २०५ आणि २०६ या शाखांना दोन्ही ठाकरे बंधू भेट देणार आहेत.या शाखा भेटींच्या माध्यमातून शिवडीतील उमेदवार किरण तावडे, सुप्रिया दळवी, सचिन पडवळ, श्रद्धा जाधव आणि भारती पेडणेकर यांच्या प्रचाराला बळ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शाखा पातळीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, आगामी निवडणुकीतील रणनीती आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याचे स्पष्ट संकेत या भेटींमधून ठाकरे बंधूंकडून दिले जाणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे यांचे कुटुंब प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे मुंबईतील विविध शाखांना भेटी देत असून संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
आजही देखील त्यांच्या शाखा भेटींची मालिका सुरू राहणार आहे. आज मनसेचे नेते अमित ठाकरे देखील स्वतंत्रपणे शाखांना भेट देणार आहेत. एकूणच जाहीर सभांच्या गाजावाजाऐवजी शाखा, कार्यकर्ता आणि स्थानिक नेतृत्व यांवर भर देत ठाकरे बंधू शिवडीतील बालेकिल्ला अधिक मजबूत करण्यासाठी मैदानात उतरल्याचे स्पष्ट चित्र आजच्या दौऱ्यातून दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.