

महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारीवरुन भाजपमध्ये वाद
सायनमधील प्रतीक्षा नगरमध्ये खोटा AB फॉर्म
या प्रभागातील राजकारण पूर्णपणे तापले
मुंबईतील सायन विभागातील प्रतीक्षा नगर प्रभाग क्रमांक १७३ मध्ये महायुतीअंतर्गत उमेदवारीवरून मोठा राजकीय वाद उफाळून आला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटयांच्यातील युतीमुळे या प्रभागातील राजकारण पूर्णपणे तापले असून त्याचा थेट फायदा विरोधकांना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपच्या शिल्पा दत्ता केळुस्कर यांना भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी अधिकृत A व B (AB) फॉर्म दिला होता. मात्र महायुतीच्या समन्वयातून या प्रभागात शिवसेना (शिंदे गट) कडून माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. शिल्पा दत्ता केळुस्कर पक्षाकडून मिळालेल्या AB फॉर्मची कलर झेरॉक्स प्रत स्वतःकडे ठेवली असा आरोप आहे. नंतर अमित साटम यांनी अधिकृत AB फॉर्म परत मागितल्यानंतर, दत्ता केळुस्कर यांनी खरा AB फॉर्म पक्षाकडे परत दिला.
हा वाद इथेच थांबला नाही. ३० तारखेला उमेदवारी अर्ज भरताना, दत्ता केळुस्कर यांच्या पत्नीने भाजपचा कलर झेरॉक्स केलेला AB फॉर्म आणि अपक्ष उमेदवाराचा अर्ज असे दोन अर्ज भरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याच वेळी भाजपमध्येच असलेले विजय पगारे यांनी देखील आपल्या पत्नीचा अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांनी दत्ता केळुस्कर यांच्या पत्नीने सादर केलेल्या खोट्या / डुप्लिकेट AB फॉर्मवर आक्षेप घेतला.
या प्रकरणाची दखल घेत अमित साटम यांनीही निवडणूक आयोगाकडे स्वतंत्रपणे तक्रार केली असून, डुप्लिकेट AB फॉर्म रद्द करण्याची व योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.या सगळ्या घडामोडींमुळे आता प्रभाग क्रमांक १७३ मध्ये शिंदे गट विरुद्ध भाजप अशी थेट अंतर्गत संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. याचा राजकीय फायदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट च्या उमेदवार प्रणिता प्रकाश वाघधरे यांना होऊ शकतो.
महायुतीतील अंतर्गत वाद, भाजपमधील नाराजी आणि अपक्ष उमेदवारांची संख्या पाहता, या प्रभागाचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित ठरण्याची चिन्हे आहेत. आता निवडणूक आयोग या तक्रारींवर काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.