BMC Election: मविआत दगाफटका, उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचं आव्हान

Thackeray Group Vs Congress: ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसनं आपले उमेदवार उतरवल्यानं मविआत दगाफटका झाल्याची चर्चा रंगलीय.अशातच काँग्रेसमुळे ठाकरेसेनेपुढे मोठं आव्हानं उभं राहणार आहे? ठाकरेसेनेला कोणत्या प्रभागात काँग्रेसचं आव्हानं असेल? पाहूयात. या स्पेशल रिपोर्टमधून.
Thackeray  Group Vs Congress
Congress flags seen in areas considered Uddhav Thackeray’s stronghold during Mumbai civic election campaigning.saam tv
Published On
Summary
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा

  • ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस उमेदवार मैदानात

  • मविआत दगाफटका झाल्याची जोरदार चर्चा

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला. तर ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एकत्र निवडणुकीला समोरं जात. भाजप आणि शिंदेसेनेविरोधात रणशिंग फुकलं. अशातच काही जागांवर काँग्रेस ठाकरेसेनेला छुपा पाठिंबा देईल, अशी चर्चा सुरु होती. मात्र ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातच काँग्रेसनं आपले उमेदवार उतरवल्यानं ठाकरेसेनेपुढे मोठं आव्हानं निर्माण झालयं.

तब्बल 34 प्रभागात ठाकरेसेना आणि काँग्रेस उमेदवार आमनेसामने

वर्सोवा, अंधेरी, चेंबूर, गोंवडी या ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे उमेदवार मैदानात

माहिम, भांडुप, शिवडी मतदारसंघातील प्रभागात काँग्रेसचं आव्हानं

34 प्रभागात ठाकरेंना मिळणारी मतं विभागली जाण्य़ाची शक्यता

Thackeray  Group Vs Congress
Corporation Election: संतप्त कार्यकर्त्यांनी भाजप खासदाराच्या कारला फासलं काळं; भागवत कराडांविरोधात घोषणाबाजी

दरम्यान मविआतील मित्रपक्ष असणारे काँग्रेस आणि ठाकरेसेना आमनेसामने आल्यानं मतांच्या विभाजानाचा फायदा महायुतीला होणार असल्याची शक्यता आहे. तरीही ठाकरेसेनेनं काँग्रेसबद्दल सकारात्मक भूमिका घेतलीय. वंचितनं ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात उमेदवार उतरवले नसल्यानं मागासवर्गीय मतांची विभागणी थांबून याचा फायदा ठाकरेंना होऊ शकतो. मात्र त्याचं मतदारसंघात काँग्रेसनं उमेदवारी दिल्यानं ठाकरेंपुढे मोठं पेच निर्माण झालाय.मतांच्या विभागणीमुळे आता महायुतीला आणि त्यातही भाजपला रोखणं ठाकरेंना शक्य होणार का? बालेकिल्ला राखण्यात ठाकरे ब्रँड यशस्वी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Thackeray  Group Vs Congress
Congress Vanchit alliance : 'वंचित'कडून काँग्रेसचा ऐनवेळी घात? महापालिका लढण्यासाठी प्यादेच नसल्याचा धक्कादायक प्रकार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com