Mumbai news Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबई पोलिसांचा कडक बंदोबस्त; १५ दिवस पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव, नेमकं कारण काय?

Mumbai Latest News : मुंबई शहरात पोलिसांकडून कडक बंदोबस्त पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून १५ दिवस पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव घातलाय. जाणून घ्या नेमकं कारण.

Vishal Gangurde

मुंबई : मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळत आहे. मुंबई पोलिसांकडून पाच पेक्षा अधिक लोकांना बेकायदेशीररित्या १५ दिवस एकत्र येण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून शहरात ९ जानेवारी ते २३ जानेवारीपर्यंत एकत्र येण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. ९ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून हा आदेश लागू करण्यात आला आहे.

'द हिंदू'च्या मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई शहराच्या सुरक्षेच्या कारणात्सव पोलिसांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. २३ जानेवारीपर्यंत पोलिसांनी प्रतिबांधात्मक आदेश काढला आहे. मुंबई शहरातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ५ पेक्षा अधिक लोकांना बेकायदेशीरित्या एकत्र येण्यास मज्जाव मनाई आदेशाद्वारे करण्यात आला आहे.

पोलिसांच्या मनाई आदेशात विवाह, अंत्यसंस्कार, सहाकारी संस्था,सामाजिक संघटना, कंपन्या आणि सरकार संबंधित कार्यक्रमासाठी सुट देण्यात आली आहे. शहरातील शांतता भंग होऊ नये. यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे. या प्रतिबंधित कालावधित सुरक्षेच्या प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार, हा मनाई आदेश लागू केला जातो. शहरात १५ दिवसांसाठी पोलिसांकडून मनाई आदेश जारी करण्यात येतो. राजकीय वातावरण आणि अन्य कारणांवरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या आदेशानुसार, पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचे आंदोलन किंवा निदर्शनं करता येणार नाही.

येत्या २६ जानेवारी रोजी देशभरात प्रजाकसत्ता दिन साजरा केला जाणार आहे. या दिवसानिमित्त अनेक परदेशातूनही पाहुणे मुंबईत येतात. परदेशातून आलेली बहुतेक मंडळी मुंबईला भेट देतात. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस पावले उचण्यात येऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाडेपट्ट्याने शेतजमीन करणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळेल का? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update: नीलम गोर्हे कल्याण जीआरपी पोलीस ठाण्यात दाखल

Gold Investment: आता NSE वर शेअर्सप्रमाणे खरेदी करू शकाल सोने; काय आहे EGR? जाणून घ्या फायदे-तोटे

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

SCROLL FOR NEXT