Mumba Devi Mandir : श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी परिसराचा पुनर्विकास; CM एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Mumba Devi Temple : श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास करणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
CM Eknath Shinde on Mumba Devi Temple
CM Eknath Shinde on Mumba Devi Temple@mieknathshinde/ Twitter
Published On

CM Eknath Shinde on Mumba Devi Temple : श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास करणार आहे. त्यासाठी मुंबादेवी मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, गुरुवारी दिले. (Latest Marathi News)

काळबादेवी येथील मुंबादेवीचे दर्शन घेऊन या परिसराची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बोलत होते.

यावेळी महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, आमदार सदा सरवणकर, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, माजी मंत्री राज के पुरोहित व माजी नगरसेवक आकाश पुरोहित, अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारासु आदी उपस्थित होते.

CM Eknath Shinde on Mumba Devi Temple
Dr. Eknath Shinde: CM एकनाथ शिंदेंना डी लीट पदवी; 'मी यापूर्वी अनेक ॲाफरेशन केल्याने मी आधीच डॅाक्टर झालो'

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मुंबादेवी हे प्राचीन मंदिर असून याप्रती सर्वांनाच श्रध्दा,आस्था आणि प्रेम आहे. मुंबादेवी मंदिर परिसरात अनेक भक्तगण भेट देत असतात. श्री काशी विश्वनाथ मंदिर व उज्जैन स्थित महाकाल मंदिर कॉरिडॉर, तिरूपती देवस्थानांच्या धर्तीवर विकास करण्यात यावा अशी मागणी मुंबईकरांची आहे.'

CM Eknath Shinde on Mumba Devi Temple
CM Shinde On Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील परिस्थिती नियंत्रणात, सर्वांनी एकोपा कायम राखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

या परिसरात अत्यावश्यक असणाऱ्या सोयी सुविधा लक्षात घेवून त्या ठिकाणी दर्शन रांगा, पार्किंग आणि येथे आवश्यक असणाऱ्या परिसराच्या विकासाबाबत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com