भूषण शिंदे
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज डी.लिट ही पदवीने गौरव करण्यात आला आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून ही पदवी त्यांना देण्यात आली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शिंदे यांना ही पदवी बहाल करण्यात आली आहे.
कधी विचार केला नव्हता पण बरंच काही मिळत गेलं. डॉक्टरेट पदवी मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. डी. लिट पदवी दिल्याबद्दल मी विद्यापीठाचे आभार मानतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (Political News)
डी वाय पाटील विद्यापीठाने अनेक थोर विचारवंत, खेळाडू यांना डी लीट पदवी दिली आहे. आज या यादीत माझे नाव आले आहे. माझ्या मुलाचे वैद्यकीय शिक्षण याच कॅालेजमधून झाले असून मलाही याच विद्यापीठाने डी लीट पदवी दिल्याने मला विशेष समाधान आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
मी आधीच छोटी मोठी ॲाफरेशन केली असल्याने मी आधीच डॅाक्टर झालो होतो, अशी मिश्किल टिप्पणी देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. ही पदवी मी महाराष्ट्रामधील लोकांना अर्पण करत आहे. जे संघर्ष करून पुढे जात आहेत त्यांना अर्पण करत आहे.
राज्यातील जनतेने मला भरपूर प्रेम दिले आहे. त्यामुळेच मी आज इथे आहे. डी वाय पाटील यांनी शिक्षणाला एका साच्यातून बाहेर आणले. त्यांनी शिक्षणात मोठं काम केलं आहे. नवी मुंबईत काहीच नसताना येथे डी वाय पाटील विद्यापीठ सुरू केले. यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलला, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
१९८९ साली मेडिकल कॅालेज सुरू करायचे होते. त्यासाठी बाळासाहेबांनी मदत केली. या मेडिकल कॉलेजसाठी राजावाडी रुग्णालयाचे दरवाजे उघडून या विद्यापीठाला मदत केली. हे डी वाय पाटील विसरले नाहीत. राज्यपाल होताच ते पहिल्यांदा बाळासाहेबांचा आर्शिवाद घेण्यासाठी मातोश्रीवर गेले होते, या आठवणींना देखील एकनाथ शिंदेंनी यावेळी उजाळा दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.