दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

Maratha Roar at Jantar Mantar: Jarange Patil Backs NEET Protesters: दिल्लीतल्या आंदोलनात मराठा एल्गार दिसलाय. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटलांची जंतरमंतरवर एन्ट्री झाली आहे. वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, असा इशारा त्यांनी मोदी सरकारला दिलाय. पाहूया एक रिपोर्ट...
MARATHA PROTEST REACHES DELHI: MANOJ JARANGE PATIL WARNS GOVERNMENT AT JANTAR MANTAR
MARATHA PROTEST REACHES DELHI: MANOJ JARANGE PATIL WARNS GOVERNMENT AT JANTAR MANTARsaam tv
Published On

नीट पेपरफुटीवरुन जंतरमंतरवर सुरु असलेल्या आंदोलनाची धग आता देशभरात जाणवतेय. महाराष्ट्रातही याचे तीव्र पडसाद उमटत असतानाच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक जण विद्यार्थ्यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठींबा देतायेत. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटलांचीही दिल्लीत एन्ट्री झाली आहे. जंतर-मंतर मैदान गाठत त्यांनी काँक्रोज जनता पार्टिचे संस्थापक अभिजीत दीपके यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणेही होते. ज्या-ज्या वेळेस हाक देतील त्यावेळेस मदतीसाठी येऊ अशी ग्वाही जरांगेंनी आंदोलकांना दिलीय.

जरांगेंनी भेट घेतल्यानंतर अभिजीत दिपके यांनी एक्सवर पोस्ट केले आहे की, "मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील साहेब यांनी जंतर-मंतर येथे येऊन दिल्ली पोलिसांच्या क्रूर कारवाईनंतर विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार."

"जरांगे पाटील साहेबांनी आमच्या आंदोलनाला आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला आपला जाहीर पाठिंबा दिला. त्यांच्या या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे."

एवढंच नव्हे तर जरांगेंनी सरकारला दम भरलाय. विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीमार केल्यास थेट दिल्लीत येऊन सरकारचा माज उतरवणार असा इशाराच जरांगेंनी दिलाय. या आंदोलनाला केवळ महाराष्ट्रातल्या मराठ्यांचाच नव्हे तर पंजाबमधल्या शिख बांधवांनीही खुला पाठिंबा दिलाय. मोठ्या संख्येनं शिख बांधव थेट जंतरमंतर मैदानात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता देशभरातून विविध समाजाच्या नेत्यांचा पाठिंबा वाढत जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com