

जंतरमंतर आंदोलन ताज्या घडामोडी
विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज दिल्ली
नीट पेपरफुटी आंदोलन हिंसक वळण
दिल्लीमधील जंतरमंतर येथील परिस्थिती अजून बिघडली असून आंदोलनकर्त्यांवर पुन्हा लाठीचार्ज करण्यात आलाय. आंदोलन करणाऱ्या पैकी काहींनी पोलिसांवर दगडफेक आणि बाटल्या फेकल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.नीट पेपर फुटप्रकरणी केंद्रीय उच्च शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच पार्टीकडून आंदोलन सुरू आहे.
जंतरमंतर येथे कॉक्रोच पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके उपोषण करत आहे. दोन दिवसांपूर्वी आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर आता २२ जुलैच्या रात्री अचानक आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण मिळालं आहे. जंतर-मंतरवर जमलेला आंदोलकांचा जमाव पुढे टॉलस्टॉय मार्गावर पोहोचलाय. यावेळी आंदोलकांनी पोलीस आणि रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) च्या जवानांवर दगडफेक आणि बाटल्या फेकल्याचा आरोप केला जातोय. अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला.
या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात दगडफेक केली जत असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे, पोलीस हे तरुणांवर लाठीचार्ज करताना दिसत आहेत. यामध्ये काही तरुणांनी पोलिसांवर हल्ला केल्याचं दिसून येत आहे.या घटनेत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यानंतर पोलीस आणि RAF ने तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली असून, सध्या टॉलस्टॉय मार्गावरील परिस्थिती नियंत्रणात आलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.