Sakri Police : घराबाहेर अवैध दारूचा साठा; साक्री पोलिसांची मोठी कारवाई, ७७ लाखाचा साठा जप्त

Dhule News : धुळ्याच्या साक्री तालुक्यातील म्हसदी येथे घराबाहेर मोठ्या प्रमाणात दारूचा साठा असलेले वाहन ऊभे असल्याची माहिती गुप्त माहितीदारा मार्फत पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती
Sakri Police
Sakri PoliceSaam tv
Published On

धुळे : साक्री तालुक्यात साक्री पोलिसांनी अवैध दारू संदर्भात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत घराच्या बाहेर उभ्या असलेल्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा भरून ठेवण्यात आला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत दारूचा साठा जप्त केला आहे. मात्र यातील संशयित फरार झाले आहेत. 

धुळ्याच्या साक्री तालुक्यातील म्हसदी येथे घराबाहेर मोठ्या प्रमाणात दारूचा साठा असलेले वाहन ऊभे असल्याची माहिती गुप्त माहितीदारा मार्फत पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापेमारी केली असता पोलिसांना वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळून आला आहे. पोलिसांच्या कारवाईची भनक लागल्याने संबंधित संशयित आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला आहे. 

Sakri Police
Fraud Case : स्टेट बँकेचे बनावट नियुक्ती पत्र देत साडेबारा लाखात फसवणूक; पोलीस अधिकाऱ्याच्या भावाचे कृत्य

७७ लाख २० हजाराचा मुद्देमाल हस्तगत 
पोलिसांनी या कारवाईमध्ये जवळपास ७०० दारूचे बॉक्स हस्तगत केले असून एकंदरीत जवळपास ७७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईमध्ये हस्तगत केला आहे. ही सर्व दारू गोवा राज्यातील असून ही दारू साक्री तालुक्यातील म्हसदी पर्यंत आली कशी याचा संपूर्ण तपास आता साक्री पोलीस करीत आहेत.

Sakri Police
Orange Farm : संत्र्याचे उत्पादन घटले, बदलत्या वातावरणाचा परिणाम; आंतरपीक म्हणून टरबुजाची लागवड

हाडाखेडजवळ १९ लाखांचा गुटखा जप्त
मुंबई- आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथील हॉटेलजवळ उभा ट्रेलर ताब्यात घेऊन सांगवी पोलिसांनी १८ लाख ६० हजारांचा गुटखा जप्त केला. कारवाईत चालकाला ताब्यात घेतले आहे. सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. खातरजमा करत हाडाखेड शिवारातील हॉटेलवर ट्रेलर संशयास्पद उभा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संशयावरून चालक साऊद फरमिन खान याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तर दिले. पोलिसांनी ट्रेलरची झडती घेतली असता तंबाखूची साडेचार हजार पाकिटे, निळ्या रंगाची ११ हजार पाकिटे असा मुद्देमाल आढळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com