Fraud Case : स्टेट बँकेचे बनावट नियुक्ती पत्र देत साडेबारा लाखात फसवणूक; पोलीस अधिकाऱ्याच्या भावाचे कृत्य

Nandurbar News : कोरोना काळात नोकरी गेल्यानंतर योगेश हा घरी राहत होता. त्याच दरम्यान आकाश अहिरे नामक पोलीस अधिकाऱ्याच्या भावाने स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई शाखेत नोकरीचे आमिष देत फसवणूक केली
Fraud Case
Fraud CaseSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या धडगाव शहरात नोकरीचे आमिष दाखवत एका सामान्य कुटुंबातील तरुणाला १२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित तरुणाचे वडील चहाची टपरी चालवतात. तर आई फळ विकून आपला उदरनिर्वाह करते. फसवणूक झाल्यानंतर कुटुंबीयांवर मोठ संकट आलो असून त्यांनी धडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

कॉम्प्युटर इंजीनियरिंग शिक्षण झालेला योगेश आई- वडिलांसोबत धडगाव शहरात राहतो. वडील चहाची टपरी चालवतात, तर आई रस्त्यांवर फळे विकण्याचं काम करत त्यांचा उदरनिर्वाह चालतो. दरम्यान कोरोना काळात नोकरी गेल्यानंतर योगेश हा घरी राहत होता. त्याच दरम्यान आकाश अहिरे नामक पोलीस अधिकाऱ्याच्या भावाने त्याला नोकरीचे आमिष देत त्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई शाखेत नोकरी लावून देण्याचे सांगत त्याच्याकडून १४ लाख रुपयांची मागणी केली.  

Fraud Case
Strawberry Farming : सातपुड्यातील दुर्गम भागात स्ट्रॉबेरीचे उत्पादन; २९ हेक्टर क्षेत्रावर केली लागवड

बनावट जॉइनिंग लेटर 

मात्र एवढे पैसे देण्यास नकार दिल्यानंतर १२ लाख ५० हजार रुपये देण्याचं ठरलं. टप्प्याटप्प्याने योगेश मोरे या सुशिक्षित बेरोजगाराने हे पैसे संबंधितांच्या बँक अकाउंटवर तर कधी कॅश स्वरूपात टप्प्याटप्प्याने पाठवायला सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने पैसे दिल्यानंतर एका महिलेने त्याला स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई शाखेत जॉइनिंग लेटर व्हाट्सअपच्या माध्यमातून पाठवले. तर तुला मुंबई शाखेत जॉइनिंगसाठी बोलावलं असल्याचे देखील महिलेने सांगितलं. त्यानुसार योगेश कागतपत्र पडताळणीसाठी मुंबईला पोहोचला.  

Fraud Case
Irai Dam : हजारो किलोमीटरचा प्रवास करत इरई धरण परिसरात पक्ष्यांचे आगमन; चंद्रपूर जिल्ह्यातील पक्षी निरीक्षकांसाठी पर्वणी

चार जणांविरोधात गुन्हा दाखल 

मुंबईतील अनेक स्टेट बँकेच्या शाखेचा पत्ता देण्यात आला होता. मात्र तिथे गेल्यानंतर त्याला वारंवार फिरवण्यात आले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच योगेशने संबंधित महिला आणि त्या चारही जणांना संपर्क केल्यानंतर पैशाची मागणी केली. मात्र वारंवार पैसे मागूनही देत नसल्याने अखेर योगेशने पोलीस स्टेशन गाठत फसवणूक करणाऱ्या या चौघांविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com