

पालघर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे डहाणू आणि तलासरी तालुक्यात सुट्टी जाहीर करण्यात आली.
सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या उद्या बंद राहणार आहेत.
रुपेश पाटील, साम प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने महाविद्यालय आणि सर्व शाळांबाबत मोठा निर्णय घेतलाय. हवामान विभागाने उद्यासाठी पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने उद्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. यासह नागरिकांनाही प्रशासनाकडून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ( Heavy Rain Alert: Holiday Declared for Schools, Colleges and Anganwadis in Palghar)
पालघर जिल्ह्यात आज सायंकाळपासून अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.तर ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर ही परिणाम झाला आहे. अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरून जिल्ह्यातील त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलीय. संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकारी यांना प्रदान करण्यात आलेत. संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहिर करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.
त्यांच्या शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहिर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. बुधवार रोजी पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. डहाणू उपविभागात डहाणू आणि तलासरी तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. यामुळे तालुक्यात सर्व माध्यमाच्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.