दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

Pawar-Modi Meeting Raises Eyebrows During NEET Protest Heat: दिल्लीतील जेन झी आंदोलनामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. तर दुसरीकडे, पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीनं सर्वांना धक्का दिलाय. पवार-मोदी यांच्या भेटीगाठीमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झालीये. पाहूयात यावरचा एक रिपोर्ट...
SHARAD PAWAR MEETS PM MODI AMID DELHI PROTESTS SPARKS POLITICAL SPECULATION
SHARAD PAWAR MEETS PM MODI AMID DELHI PROTESTS SPARKS POLITICAL SPECULATIONsaam tv
Published On

रोहित कदम, साम टीव्ही

दिल्लीत नीट पेपर लीक आणि पोलिसांच्या लाठीचार्जमुळे वातावरण तापलेलं असताना मध्येच पवारांनी नेहमीप्रमाणे गुगली टाकल्यामुळे वेगळ्याचा चर्चांना उधाण आलंय. दिल्लीत विरोधकांकडून सरकारविरोधात निदर्शनं सुरू असतानाच इंडिया आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. देशभरात नीट पेपरफुटीविरोधात सर्वच विरोधक एकवटलेले असताना शरद पवार मात्र पंतप्रधान मोदींना भेटल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे, पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान, पवारांसोबत खासदार सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. मात्र यावरून राज्यात सत्ताधारी पक्षांमध्ये प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

खरंतर, भाजप डीलिमिटेशन विधेयक संसदेत मंजूर करण्यासाठी विरोधकांना गळाला लावण्याचा प्रयत्न करतंय. याच पार्श्वभूमीवर पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. विशेष म्हणजे पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि भाजपचे महासचिव विनोद तावडे यांच्यात गुप्त बैठका झाल्याची चर्चा आहे. मात्र, आता नीट पेपरफुटी प्रकरणावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरलेलं असताना पवारांनी मोदींच्या अचानक घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com