Mumbai News: ठेकेदाराला धमकावत खंडणी मागितली, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा

Shivsena Shinde Group: ५ लाखांची खंडणी द्यावी म्हणून महापालिकेच्या एका ठेकेदाराला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यालयात बोलावून शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना कांदिवलीमध्ये घडली.
Mumbai News: ठेकेदाराला धमकावत खंडणी मागितली, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा
Shivsena Shinde GroupSaam Tv
Published On

संजय गडदे, मुंबई

ठेकेदाराला धमकावत खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदिवलीमध्ये ही घटना घडली आहे. मुंबईच्या कांदिवलीतील रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी ५ लाखांची खंडणी द्यावी म्हणून महापालिकेच्या एका ठेकेदाराला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यालयात बोलावून शिवीगाळ करत मारहाण करून धमकी दिली. याप्रकरणी शिंदे गटाचे कांदिवली विभाग प्रमुख लालसिंग राजपूतसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लालसिंग राजपूतसह गणेश पवार, पिंटो जयस्वाल, विकास गुप्ता, निलेश जयस्वाल, सुरेश शहा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लालसिंग राजपूत आणि गणेश पवार यांनी 27 डिसेंबर रोजी कंत्राटदाराकडे खंडणी मागितली. मात्र खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे कांदिवली पश्चिमेकडील इराणीवाडी दत्ताने रोड येथील विभाग प्रमुख लालसिंग राजपूत यांच्या कार्यालयात बोलावून शिवीगाळ करत एकूण 15 जणांनी कंत्रालदाराला मारहाण केली. या प्रकरणी कांदिवली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 308(2), 308(3), 308(5), 127(2), 190,191(3),189(2),118(1),322 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai News: ठेकेदाराला धमकावत खंडणी मागितली, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा
Mumbai : अपहरण केलं, मग अश्लील व्हिडीओ काढले अन् ६ लाख लंपास केले, मुंबईतील धक्कादायक प्रकाराचा असा झाला उलगडा

मुंबईत सध्या महापालिकेच्या माध्यमातून विविध रस्त्यांची कॉंक्रिटीकरणाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. यापैकीच कांदिवली पश्चिमेकडील एका रस्त्याचे काम आशिष शैलेश मल्हा (29 वर्षे) या कंत्राटदाराला मिळाले होते. हे काम सुरू करण्याकरता शिवसेना शिंदे गटाचे कांदिवली विभाग प्रमुख लालसिंग राजपूत आणि गणेश पवार यांनी आशिष मल्हा यांच्याकडे 5 लाख रुपयांची खंडणी मागितली.

मात्र आपण 5 लाख रुपये देऊ शकत नाही असे कंत्राटदाराने लाल सिंग राजपूत आणि गणेश पवार यांना सांगितले. त्यानंतर खंडणी दिली नाही म्हणून ऑफिसमध्ये बोलावून लालसिंग राजपूत आणि गणेश पवार यांनी कंत्राटदाराला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी आणि लाकडी बांबूने मारहाण करत धमकी दिली.

Mumbai News: ठेकेदाराला धमकावत खंडणी मागितली, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा
Mumbai : मुंबईजवळील समुद्रात पुन्हा बोटीचा अपघात; जहाजाच्या धडकेत बोट बुडाली, थरारक व्हिडिओ आला समोर

मारहाण झाल्यानंतर कंत्राटदार आशिष शैलेश मल्हा आणि इतर सर्वांनी कांदिवली पोलिस ठाण्यात जाऊन लालसिंग राजपूत गणेश पवार विकास गुप्ता पिंटू जयस्वाल निलेश जयस्वाल आणि सुरेश शहा आणि त्यांच्या इतर साथीदारांविरोधात तक्रार दिली या तक्रारीनंतर कांदिवली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 308(2), 308(3), 308(5) ,127(2), 190,191(3), 189(2) ,118(1),322 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या कांदिवली पोलिसांकडून या सर्व आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Mumbai News: ठेकेदाराला धमकावत खंडणी मागितली, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा
Navi Mumbai: नवीन वर्षाचं खास गिफ्ट! नवी मुंबई विमानतळावर उतरलं पहिलं विमान, व्हिडिओ आला समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com