Somnath Suryavanshi Case: ही पोलिस कोठडीतील हत्या नाहीच, सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणावर गृहराज्यमंत्र्यांची माहिती

Pankaj Bhoir On Rahul Gandhi: सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनी केली असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी याप्रकरणाबाबत मोठं वक्तव्य केले आहे.
Somnath Suryavanshi Case: ही पोलिस कोठडीतील हत्या नाहीच, गृहराज्यमंत्र्यांनी माहिती
Pankaj Bhoir On Somnath Suryavanshi CaseSaam Tv
Published On

परभणी हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता. सोमनाथ सूर्यवंशी यांची मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच झाला असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावरून राजकारण चांगलेच तापले आहेत.

अशामध्ये आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनी केली असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी याप्रकरणावर मोठं वक्तव्य केले आहे. ही पोलिस कोठडीतील हत्या नाहीच, असं त्यांनी सांगितले.

वर्ध्यामध्ये माध्यमांशी बोलताना गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, 'विरोधक हे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात अशा काही संघटना आहे की त्यांना महाराष्ट्र स्थिर नको आहे. इथे काही घडत गेलं पाहिजे अशा पद्धतीचे प्रयत्न त्यांच्या मार्फत सुरु असतात. परंतू महाराष्ट्रातली जनता समजदार असून अशा खोट्या प्रचाराला बळी पडणार नाहीये. सामान्य लोकांसह नेत्यांनीही अशा पद्धतीचं वातावरण निर्माण न करता चांगल्या पद्धतीचे वातावरण कसं राहील याचा प्रयत्न करावा.'

तसंच, 'परभणी प्रकरणात सभागृहात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी चुकीची माहिती दिली अशी मांडणी राहुल गांधी यांनी करणं चुकीचं आहे. कारण तो पटलावर येत असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सत्य माहिती सभागृहला दिली आहे. ही पोलिस कोठडीतील हत्या नाहीये. शवविच्छेदनाचा अहवाल पाहिला तर त्यांना श्वासाचा दुर्धर आजार होता.', असे पंकज भोयर यांनी सांगितले.

पंकज भोयर यांनी पुढे सांगितले की, 'न्यायाधीशांनी जेव्हा त्यांना विचारलं की तुम्हाला थर्ड डिग्रीचा वापर करण्यात आला होता का तेव्हा न्यायाधीशाच्या आदेशात पास झालं आहे की, स्वतः सोमनाथ सूर्यवंशी यांनी सांगितलं की मला कुठल्याही प्रकारची मारहाण ही पोलिसांकडून झालेली नाही जेव्हा पोलिस कोठाडीतून न्यायालयनीन कोठाडीत त्यांना पाठविण्यात आले तिथे त्यांचा मृत्यू झाला आहे.'

'देशभरात संविधानाचा सन्मान करण्याचा अभियान हे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून सुरु आहे. जितका सन्मान भाजपच्या कार्यकाळात दलित समाजाला देण्यात आला, जी काम करण्यात आली ते इतिहासात कधीही करण्यात आले नव्हते.', असे देखील गृहराज्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com