Pune Fake School: विद्यार्थ्यांना मारहाण, फीसाठी आर्थिक पिळवणूक, पुण्यातील 'त्या' बोगस शाळेवर गुन्हा दाखल

Pune Fake School Case Filled: पुण्यातील मांजरी येथील मॅरेथॉन इंटरनॅशनल शाळा बोगस असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर, या शाळेविराधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Pune Fake School
Pune Hadapsar Fake SchoolSaam Tv News
Published On

पुण्यातील मांजरी येथील मॅरेथॉन इंटरनॅशनल शाळा बोगस असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर, या शाळेविराधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या शाळेच्या मान्यतेची कागदपत्रे बनावट असल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर, या बोगस शाळेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाने दिले आहेत. या शाळेविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे शाळा मालकाच्या अडचणी वाढल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी मॅरेथॉन इंटरनॅशनल शाळेकडे शासनाची मान्यता नाही, यूडायस क्रमांक नाही, ही बाब समोर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं पालकांच्या निदर्शनास आले. एवढंच नाही तर, विद्यार्थ्यांना मारहाण, शाळेच्या फीसाठी आर्थिक पिळवणूक अशा तक्रारी पालकवर्गाकडून करण्यात आल्या. या सर्व प्रकारची गंभीर दखल जिल्हा परिषद विभागाने घेतली आणि त्वरीत पाऊलं उचलण्यास सुरूवात केली. या सर्व पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी शाळा व तक्रारदार सुनावणी घेतली.

Pune Fake School
Fake Fertilizer Sale : खत विक्रेत्यावर कॉपी राईटचा गुन्हा दाखल; कंपनीचा लोगो वापरून बनावट खत विक्री

यासंदर्भात शाळेला विचारणा केली असता, त्यांनी कागदपत्रे दाखवली. कागदपत्रांची पडताळणी केली असता शाळेची कागदपत्रे बनावट असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर शिक्षण विभागानं शाळेला आपले म्हणणं मांडण्याची संधी दिली. १५ दिवसांमध्ये शाळेची मुळ कागदपत्रे मंत्रालयातून प्राप्त करून सादर करण्याचे निर्देश दिले. मात्र, १५ दिवसांच्या मुदतीनंतरही शाळा आपली कागदपत्रे सादर करू शकली नाही.

Pune Fake School
Fake Butter: नकली बटरने विषबाधेमुळे लिव्हर,किडनीला धोका; काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

या सर्व प्रकरणानंतर शाळेची कागदपत्रे बनावट असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर शिक्षणाधिकारी यांनी हवली गट शिक्षणधिकाऱ्यांना बोगस शाळेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार शाळेवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल केल्यानंतर शाळेची पूर्ण चौकशी करण्यात यावी अशी मागणी तक्रारदारांनी केली. तसेच राज्यात आणखीन किती बोगस शाळा आहेत त्याची चौकशी शिक्षण विभागाने करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com