Thackeray Group On Shivdi Nhava Sheva Project Saamtv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: 'न केलेल्या कामाचं क्रेडिट कोण घेतयं? 'शिवडी न्हावा शेवा' प्रकल्पावरुन ठाकरे गटाचा भाजपला सवाल

Thackeray Group On Shivdi Nhava Sheva Project: मुंबई ट्रान्सहार्बर लिंक रोड हा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. हे आम्ही अभिमानाने सांगतो, असा दावाही ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

Shivdi Nhava Sheva Toll:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील सर्वात लांब सागरी सेतू शिवडी-न्हावाशिवा पुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. अटले सेतु असे या ब्रीजला नाव देण्यात आले आहे. तत्पुर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शिवडी न्हावाशिवा पुलाच्या प्रकल्पावरुन थेट भाजपवर निशाणा साधला आहे. शिवडी न्हावा शेवा रोडचं काम केलं कुणी श्रेय घेतंय कोण? असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

शिवडी-न्हावाशिवा शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचं काम केलं कुणी आणि श्रेय घेतंय कोण? असा प्रश्न एक्स पोस्टद्वारे करण्यात आला आहे. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक रोड हा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारच्या काळातील ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. हे आम्ही अभिमानाने सांगतो, असा दावाही ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

तसेच उत्तम नियोजन आणि कोविड काळातही सातत्याने पाठपुरावा या सगळ्या गोष्टींचे यश एम टी एच एल आहे. जून 2022 गद्दारीमुळे सरकार पडेपर्यंत केवळ 30 महिन्यात 85% पुलाचे काम आम्ही पूर्ण करून दाखवलं उरलेल्या 15 टक्के कामासाठी दीड वर्षे घेऊन आणि व्हीआयपी ची वाट बघत त्यांनी उद्घाटन रखडून दाखवलं, अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निमंत्रण पत्रिकेत नावही नाही...

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणाऱ्या शिवडी नावाशिवा प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमावर ठाकरे गटाने बहिष्कार टाकला आहे. हा प्रकल्प ठाकरे गटाच्या लोकप्रतिनिधींच्या भागात येत असतानाही त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्याने ठाकरे गटाने नाराजी दर्शवली आहे. तसेच अगदी शेवटच्या क्षणी त्यांना निमंत्रण आल्याने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही ठाकरे गटाने घेतला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

First Metro: जगातील पहिली मेट्रो कधी आणि कुठे सुरू झाली? जाणून घ्या रंजक इतिहास

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट

जुना वाद जिवावर उठला! ५ जणांनी अल्पवयीन मुलाच्या अंगावर टेम्पो घातला; रस्त्यावर चिरडून मारलं

Bogus Doctor : बोगस डॉक्टरांचे पितळ उघडे; पदवी नसताना रुग्ण तपासणी, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Government Apps: आता मोबाईलवर मिळणार सरकारी सेवा; फक्त एका क्लिकमध्ये, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT