Maharashtra Political News : आमदार अपात्रता निकालाचा ठाकरे गटाला फायदा होणार? शिंदे गट आणि भाजपचं काय? वाचा सविस्तर

Mla Disqaulification Result : विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाच्या बाजूने एक सहानुभूतीची लाट निर्माण होऊ शकते, असा अंदाज जाणकारांचा आहे. जाणकारांच्या अंदाजाला दुजोरा देणारं विधान शरद पवारांनी केलं.
Shiv Sena MLA Disqualification
Shiv Sena MLA DisqualificationSaam Digital
Published On

Political News :

राज्याचं आणि देशाचं लक्ष लागलेल्या आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला. ठाकरे गटाला धक्का बसला असता तरी सर्व आमदार पात्र असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. खरी शिवसेना शिंदेंचीच असल्याचं शिक्कामोर्तब विधानसभा अध्यक्षांनी केलं. या निर्णयामुळे शिंदे गटात आनंदाची लाट आहे. तर ठाकरे गट या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे.

मात्र या निर्णयाने आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर कसे होतील, याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं. निर्णयाचा ठाकरे गटाला आणि महाविकास आघाडीला फायदा होईल, असे मत अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. जाणकार आणि राजकीय विश्लेषकांनीही या निर्णयाचा फायदा ठाकरे गटाला होईल, असा अंदाज व्यक्त केलाय.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shiv Sena MLA Disqualification
Maharashtra Politics: विधानसभा अध्यक्षांचा निर्णय अंतिम नाही, खरा निकाल तिथेच लागेल; ठाकरे गटाचा हल्लाबोल

विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाच्या बाजूने एक सहानुभूतीची लाट निर्माण होऊ शकते, असा अंदाज जाणकारांचा आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद गेलं, तेव्हाही राज्यातल्या जनतेमध्ये एक सहानुभूती दाटून आली होती. जाणकारांच्या अंदाजाला दुजोरा देणारं विधान शरद पवारांनी केलं. (Latest Marathi News)

भाजपला फायदा कसा?

आमदार अपात्रता निर्णय आधीच ठरला होता, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. यामध्ये भाजपचा मोठा हात असल्याचीही टीका विरोधकांकडून होत आहे. अशात जर विधानसभा अध्यक्षांनी जर ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरवले असते तर भाजपबद्दल जनतेमध्ये चुकीचा संदेश गेला असता. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आता देशात लोकसभेची निवडणूक होऊ घातलीये. (Mumbai News)

Shiv Sena MLA Disqualification
Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीसच मुंबईचे हृदयसम्राट; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी या गोष्टीचा प्रचार केला असता आणि त्यामुळे भाजपला फटका बसण्याची भीती होती. जर ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले असते तर उद्धव ठाकरेंबद्दल एक मोठी सहानुभूतीची लाट निर्माण झाली असती. या लाटेचे रुपांतर मतांमध्ये झालं असतं असाही अंदाज होता. मात्र विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे असाही दिलासा महायुतीला मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com