PM Modi Speech At Nashik: घराणेशाहीचं राजकारण युवकांनी संपवायला हवं, PM नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही ठळक मुद्दे

PM Modi Speech At Nashik: घराणेशाहीच्या राजकारणाने देशाचं मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे घराणेशाहीला लोकशाही प्रक्रियेपासून दूर ठेवलं पाहिजे. देशाचं भविष्य असलेल्या या तरुण पिढीने येणाऱ्या काळात ही जबाबदारी स्वीकारावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेतून युवा पिढीला केलं.
PM Modi Speech At Nashik
PM Modi Speech At NashikSaam Digital

PM Modi Speech At Nashik

भारत लोकशाहीची जननी असून यात तरुणांच मोठं योगदान आहे. देशातील तरुण तरुणींनी यापुढेही लोकशाही मजबूत करण्याचं काम केलं पाहिजे. घराणेशाहीच्या राजकारणाने देशाचं मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे घराणेशाहीला लोकशाही प्रक्रियेपासून दूर ठेवलं पाहिजे. या प्रक्रियेत तरुणांचा जेवढा सहभाग जास्त असले तितकं देशाचं भविष्य उज्ज्वल असेल. देशाचं भविष्य असलेल्या या तरुण पिढीने येणाऱ्या काळात ही जबाबदारी स्वीकारावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेतून युवा पिढीला केलं. नाशिकमध्ये आयोजित युवा महोत्सवाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांनी तरुणांना आणि देशातील जनतेला संबोधित केलं.

नाशिकमध्ये आजपासून राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे. या महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्रातील नेते उपस्थित होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोदींच्या भाषणातील काही ठळक मुद्दे

आज भारत एकापेक्षा एक रेकॉर्ड तोडत असून मोठं मॅन्युफॅक्चरींग हब बनत आहे.याचं सर्व श्रेय्य युवकांना जातं.

चांद्रयान, आदित्य आदित्य एल-१ अंतराळ मोहिमा देशाचं मोठं यश

येणारा २५ वर्षांचा काळात भारताचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल.

देशाच्या विकासात नारी शक्तीचं मोठं योगदान

PM Modi Speech At Nashik
PM Modi Praises CM Eknath Shinde: PM मोदींकडून एकनाथ शिंदेंचा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उल्लेख; मराठीतून भाषणाची सुरुवात

तरुणांकडून देशाला अपेक्षा, त्यांचा सेवाभाव देशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल

गेल्या १० वर्षात तरुणांना प्रत्येक क्षेत्रात नवीन संधी दिल्या.

भगत सिंग, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त देशासाठी स्वप्न पाहिलं आणि देशासाठी लढले, त्यामुळेच देश आजही त्यांची आठवण करतो.

संपूर्ण जगाने आयुर्वेदाला मान्यता दिली आहे. त्याचं महत्त्व समजून घेतल असून भारताची जगाला ही मोठी देणगी आहे

महिलांचा वेळोवेळी होणारा अपमान बंद झाला पाहिजे

PM Modi Speech At Nashik
PM Modi Special Fast : राम मंदिर लोकार्पणाआधी PM मोदींचा ११ दिवस विशेष उपवास, देशवासियांसमोर ऑडिओ क्लिपद्वारे मांडल्या भावना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com