

शाळेतून घरी जाताना अज्ञात व्यक्तीकडून हल्ला.
प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू.
पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू.
सचिन बनसोडे, साम प्रतिनिधी
शाळेतून घरी परत जाताना सहावीत शिकणाऱ्या 11 वर्षीय मुलीवर ॲसिड हल्ला झाला आहे. ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान गावात घडली आहे. जखमी मुलीवर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अल्पवयीन पीडिता शाळा सुटल्यानंतर घरी जात होती, त्यावेळी अल्पवयीन मुलीवर अज्ञात व्यक्तीने ॲसिड फेकलं. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर ही पीडित मुलगी घरी जात होती, त्यावेळी अचानक समोर आलेल्या एका अज्ञात तरुणाने तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. या हल्ल्यानंतर मुलीने आरडाओरड केला, त्यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अॅसिडमुळे चेहरा होरपळून गेला होता, पीडितेला त्वरित लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
पीडितेची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संगमनेर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.