Pune Lok Sabha Seat: पुणे लोकसभेच्या जागेवर काँग्रेस पक्षाचा दावा? कोण आहे इच्छुक आमदार?

Congress News: आज दिल्लीत लोकसभा समन्वयकांची बैठक आहे. या बैठकीसाठी रवींद्र धंगेकर आज दिल्लीत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस मुख्यालयात भेट घेवून दिल्लीत वरिष्ठ नेत्यांकडे आपली इच्छा व्यक्त केली आहे.
Pune Lok Sabha Seat: पुणे लोकसभेच्या जागेवर काँग्रेस पक्षाचा दावा? कोण आहे इच्छुक आमदार?
Published On

अक्षय बडवे आणि प्रमोद जगताप

Pune News:

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. अशात राज्यातील काही मतदारसंघांवर नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून दावा केला जातोय. यातच आता मविआमध्ये पुण्यातील लोकसभा मतदार संघावर काँग्रेसचा दावा असल्याच्या चर्चा रंगल्यात.

Pune Lok Sabha Seat: पुणे लोकसभेच्या जागेवर काँग्रेस पक्षाचा दावा? कोण आहे इच्छुक आमदार?
Pune Corona Virus : पुण्यातील मुळशीत कोरोनाच्या नव्या JN.1 व्हेरिएंटचा शिरकाव, एक रुग्ण आढळल्याने खळबळ

लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून आमदार रवींद्र धंगेकर इच्छुक आहेत अशी माहिती समोर आलीये. आज दिल्लीत लोकसभा समन्वयकांची बैठक आहे. या बैठकीसाठी रवींद्र धंगेकर आज दिल्लीत होते. यावेळी त्यांनी कांग्रेस मुख्यालयात भेट घेवून वरिष्ठ नेत्यांकडे आपली इच्छा व्यक्त केली आहे.

सुरू असलेल्या चर्चेवरून माध्यमांशी संवाद साधताना धंगेकर म्हणाले की, होय, पक्षाने संधी दिली तर मी पुणे लोकसभेची निवडणूक लढणार. मी पक्षाकडे यापूर्वीच लोकसभेची उमेदवारी मागितली आहे.

ज्या पद्धतीने कसबाची पोटनिवडणूक जिंकली होती, त्यापेक्षा जास्त मतांनी पुण्याची लोकसभा जिंकू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. आजच्या बैठकीत खासगीत बोलताना काही नेत्यांनी मला उमेदवारी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. भाजपच्या कारभाराला पुणेकर वैतागले आहेत, त्यामुळं त्यांना बदल हवा आहे. काँग्रेसच्या रूपाने पुणेकरांना बदल नक्की दिसेल, असं धंगेकर यावेळी म्हणाले.

आज सर्व जिल्हा निरीक्षकांची बैठक आयोजित केली होती. त्यात निवडणूक तयारी बाबत मार्गदर्शन करण्यात आलं. केंद्रातील भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी आमची आघाडी काम करत आहे. आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडणून आणायचे असं आजच्या बैठकीत ठरलं असल्याचं धंगेकरांनी सांगितलं.

गडचिरोली-चिमूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून 9 जणांचे अर्ज

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले असून गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी तब्बल नऊ जणांचे अर्ज जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाकडे आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिली आहे.

यामध्ये माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी, डॉक्टर नामदेव किरसान, माजी आमदार आनंदराव गेडाम, डॉक्टर नितीन कोडवते, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदू नरोटे, निलेश मरस्कोले, डॉक्टर प्रणित जांभुळे, नारायण जांभुळे, हरिदास बरेकर यांचा समावेश आहे. माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी यांनी दोनदा लोकसभा निवडणूक लढवली असून दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला आहे. तर डॉक्टर नामदेव किरसान हे संपूर्ण लोकसभा क्षेत्र पिंजून काढत असल्याने कोणाला उमेदवारी मिळते, याकडे लक्ष लागून आहे.

Pune Lok Sabha Seat: पुणे लोकसभेच्या जागेवर काँग्रेस पक्षाचा दावा? कोण आहे इच्छुक आमदार?
Beed Crime News: स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; संशयित 2 महिलांना चौकशीसाठी घेतले ताब्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com