Mahavikas Aghadi News : महाविकास आघाडी फुटणार? दोन पक्ष भाजपला पाठिंबा देणार; बड्या नेत्याचा मोठा दावा

Mahavikas Aghadi News : राम मंदिर उद्घाटनानंतर राज्यात महायुतीविरोधात केवळ एकच पक्ष राहील. महाविकास आघाडीतील दोन पक्ष भाजपला पाठिंबा देतील, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे.
Mahavikas Aghadi News
Mahavikas Aghadi NewsSaam TV
Published On

अमर घटारे

Amravati News :

राज्यात महाविकास आघाडीने आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी निवडणुकीतील जागावाटपाच्या फॉर्म्युलाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जात आहे.

मात्र एकीकडे महाविकास आघाडीची तयार सुरु असतात ही आघाडी एकसंध राहणार की असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण महाविकास आघाडीतील दोन पक्ष भाजपला पाठिंबा देतील, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे.

राम मंदिर उद्घाटनानंतर राज्यात महायुतीविरोधात केवळ एकच पक्ष राहील. महाविकास आघाडीतील दोन पक्ष भाजपला पाठिंबा देतील, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mahavikas Aghadi News
Devendra Fadnavis: संपत्तीचे प्रदर्शन न करता साधेपणाने वावरा; फडणवीसांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान

22 जानेवारी रोजी तारखेला अयोध्या येथे पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर संपूर्ण देशाची राजकीय परिस्थिती बदलणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष भाजपला पाठिंबा देतील केवळ राष्ट्रीय पक्ष म्हणजे काँग्रेसच राज्यात शिल्लक राहील, असा दावा रवी राणा यांनी केला आहे.

देशातील अनेक पक्ष आज एकत्र झाले आहेत. अनेक पक्ष संभ्रमावस्थेत आहेत. त्यानंतर अनेक पक्ष पंतप्रधान मोदींसोबत येतील, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. यापूर्वीही अजित पवार हे भाजपला पाठिंबा देतील, असा दावा रवी राणा यांनी केला होता आणि तो खरा देखील ठरला होता.

Mahavikas Aghadi News
Thane Crime News : ठाण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड, जवळपास 100 तरुण ताब्यात; पार्टीत नेमकं काय सुरु होतं?

जयंत पाटील मनाने इकडेच

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला होता. कारण जयंत पाटील  अजित पवारांसोबत येणार होते. हा प्रस्ताव त्यांनी पुण्यात दिला होता, तेच शरद पवार साहेबांनाही सांगणार होते, असा खळबळजनक दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. जयंत पाटील हे शरीराने तिकडे आहेत, मात्र मनाने इकडेच आहेत. त्यांच्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता, असंही संजय शिरसाट म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com