Jayant Patil Interview: 'त्यावेळी मी अजित पवार यांना बोलो होतो तुम्ही अध्यक्ष व्हा, पण...', जयंत पाटील यांनी केला मोठा गौप्यस्फोट

Jayant Patil On Ajit Pawar: खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.
Jayant Patil Interview:
Jayant Patil Interview:Saam Tv
Published On

Jayant Patil On Ajit Pawar:

''अजित पवार विरोधी पक्षनेते झाले, त्याचवेळी त्यांना मी बोललो होतो की, तुम्ही अध्यक्ष व्हा मी विरोधी पक्षनेता होतो. मात्र त्यांनी सांगितलं की माझा चॉईस हा विरोधी पक्षनेता आहे. अध्यक्ष पदांमध्ये रस नाही. ते मला बोलले असते तर मी स्वतः षण्मुखानंद येथे जाहीर केलं असतं, मी 5 वर्ष पूर्ण केली आहेत. अजित पवार यांना अध्यक्ष करा,'' असा शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील म्हणाले आहेत. खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील यांची मुलाखत घेतली. त्यावेळी ते असं म्हणाले आहेत. या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.

जयंत पाटील म्हणाले, ''षण्मुखानंद येथील सभेनंतर शरद पवार यांनी मला फोन केला. त्यावेळी मी त्यांना सांगितलं अजित पवार याना अध्यक्ष करा मी 5 वर्ष पूर्ण केली आहेत. मी त्यानंतर स्वतः भेटून सांगीतल त्यावेळी शरद पवार यांनी अजित पवार याना अध्यक्ष करण्यासाठी बैठक देखील बोलावली परंतु त्याच आधी 2 जुलैला ही घटना घडली. त्यांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jayant Patil Interview:
Jyoti Mete: आगामी निवडणुकीमध्ये शिवसंग्राम पक्ष भाजपसोबत राहणार की नाही? ज्योती मेटेंनी स्पष्टच सांगितलं

2019 च्या निवडणुकीबद्दल बोलताना ते म्हणाले, ''2019 मध्ये सगळे पक्ष सोडून चालले होते. मात्र मी भाषणात म्हणालो होतो की, आपल्याकडे शरद पवार नावाचे विद्यापीठ आहे. त्यावेळी आपण 54 आमदार निवडून आणले. आपला पक्ष मोठा करायचा असेल तर त्यासाठी लोकांपर्यंत पोहचायला हवं आणि त्यासाठी परिवार संवाद यात्रा काढली होती. आमचा पक्ष एक असता तर आपली एक हाती सत्ता आणली असती. 2024 साली आपला पक्ष मोठा झाला पाहिजे असं स्वप्न होतं.''  (Latest Marathi News)

राम मंद्रबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ''राम मंदिर कार्यक्रम होतोय आता असं बोललं जात आहे. भाजप सत्तेत आल्यावर अयोध्या दौरा घेऊन जाईल, असं भाजप सांगत आहे. आगामी निवडणूक धार्मिकतेच्या मार्गावर घेऊन जात आहेत. रस्ता करून देतो म्हणालं की लोक जास्त मतं देतात रस्ता तयार झाल्यावर तेवढी मतं मिळत नाही. राम मंदिर मुद्दा मी अशा प्रकारे पाहत आहे. आताच्या काळात मुख्य मुद्याला बाजूला करण्यासाठी असं काहीतरी केलं जातं.''

Jayant Patil Interview:
Ram Mandir: दोन दिवसांची शाब्दिक चकमक, अखेर उद्धव ठाकरे यांना मिळालं राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण

ते पुढ़े म्हणाले, ''काँग्रेस मधून बाहेर पडलो, त्यावेळी शरद पवार यांच्याकडे पाहून आम्ही निर्णय घेतला होता. आता देखील ज्यावेळी शरद पवार यांनी राजीनामा दिला, त्यावेळी मी अध्यक्ष असलो तरी मला काहीही कल्पना नव्हती. त्यामुळे डोळ्यात अश्रू उभे राहिले. आम्ही शरद पवार यांचा पक्ष म्हणून आम्ही यात आलो होतो. त्यापूढे इतरांची उंची किती आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com