Jyoti Mete: आगामी निवडणुकीमध्ये शिवसंग्राम पक्ष भाजपसोबत राहणार की नाही? ज्योती मेटेंनी स्पष्टच सांगितलं

Beed Politics: दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या शिवसंग्रामचे आणि भारतीय जनता पार्टीचे नाते हे सर्वश्रुत आहे. स्वर्गीय विनायकराव मेटे यांचे निधन झाल्यानंतर, शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या पत्नी ज्योतीताई मेटे यांना विधान परिषदेवर घ्या, अशी मागणी केली जात होती.
Beed Politics
Beed PoliticsSaam Tv
Published On

Beed Politics:

दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या शिवसंग्रामचे आणि भारतीय जनता पार्टीचे नाते हे सर्वश्रुत आहे. स्वर्गीय विनायकराव मेटे यांचे निधन झाल्यानंतर, शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या पत्नी ज्योतीताई मेटे यांना विधान परिषदेवर घ्या, अशी मागणी केली जात होती.

अशा प्रकारचे निवेदन देखील त्यांनी दिले होते. मात्र दिवंगत विनायकराव मेटे यांचे निधन होऊन जवळपास आता दीड वर्ष उलटलं, मात्र भाजपकडून अद्याप ज्योती मेटे यांना विधान परिषदेवर घेतलं गेलं नाही. यामुळे शिवसंग्रामनी आपला सूर बदलण्याचा निर्धार केला की काय? अशी चर्चा आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Beed Politics
Mumbai News: मुंबईकरांनो लक्ष द्या! उड्डाण क्षेत्रात फुगे, पतंग, उंच उडणारे फटाके उडविण्यास बंदी; असं केल्यास होऊ शकते कारवाई

येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्राम आपल्या राष्ट्रीय कार्यकारणी सोबत चर्चा केल्यानंतर, येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणासोबत जायचं की स्वतंत्र लढायचं? याविषयी भूमिका स्पष्ट करणार आहेत.  (Latest Marathi News)

तर याविषयी डॉक्टर ज्योती मेटे यांना विचारलं असता, त्यांनी या प्रश्नावर बोलणं टाळलं. मात्र बीड विधानसभेची जागा ही शिवसंग्रामला हवी आहे आणि आम्ही ती घेऊ, आम्ही याविषयी आक्रमक आहोत. असं पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवलं.

Beed Politics
Ram Mandir: दोन दिवसांची शाब्दिक चकमक, अखेर उद्धव ठाकरे यांना मिळालं राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण

त्याचबरोबर आज मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना मेटे साहेबांची कमतरता आम्हाला भासते आहे. साहेबांनी जो लढा उभा केला त्याला यश मिळावं, ही आमची मनोमन इच्छा आहे, असं यावेळी ज्योती मेटे म्हणाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com