पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला काळाराम मंदिरात दर्शनासाठी आले, आनंद आहे! पण दर्शन झाल्यानंतर थोडा वेळ काढून जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही त्यांनी भेटायला पाहिजे होतं . नाशिक जिल्हा हा देशातील सर्वात मोठं कांदा उत्पादक जिल्हा आहे, पण कांदा निर्यात बंदीमुळे इथला शेतकरी पार कोलमडून पडलाय. पंतप्रधान या शेतकऱ्यांना का भेटले नाहीत? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला असून राजकारण करायला वेळ आहे, पण देशाला पोसणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू दिसत नाहीत. भाजपला केवळ धर्माच्या नावावर राजकारणाची भाकरी भाजण्याचं काम येतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, अशी घणाघाती टीका त्यांनी मोदींना लगावला आहे.
देशात कांद्याचं सर्वात जास्त कांद्याचं उत्पादन नाशिक जिल्ह्यात होतं. मात्र केंद्र सरकारने मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे दर घसरले असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यावरून राऊत यांनी आज मोदींवर निशाणा साधला. एक्सवर त्यांनी यासंदर्भात पोस्ट करून नाराजी व्यक्त केली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नाशिकमध्ये आजपासून राष्ट्रीय युवा महोत्सव होत असून या महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्रातील भाजपचे नेते उपस्थित होते.
कांद्यांचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सुरुवातीला निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केलं. त्यानंतर निर्यातबंदी केली. त्यामुळे शेतकऱ्यांची चोहोबाजूंनी कोंडी झाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होणे, प्रत्यक्षात व्यापारी खळ्यांवरून खरेदी करून माल पाठविणे, १३ दिवस लिलाव बंद राहणे असे प्रकार घडले होते. त्यामुळे कांदा चाळीतच सडला. हजारो शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.