Mumbai Car Accident  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईत माजी खासदाराविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Khar Road Accident: मुंबईतल्या खारमध्ये माजी खासदाराच्या कारने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी माजी खासदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More
  • मुंबई खार अपघात प्रकरणात मोठी अपडेट

  • माजी खासदार सुधीर सावंत यांच्याविरोधात गुन्हा

  • सुधीर सावंत यांच्या कारच्या अपघातात बीएमसी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता

  • खार अपघातात अय्यप्पन हरिजन यांचा मृत्यू तर पत्नी जखमी झाली होती

संजय गडदे, मुंबई

मुंबईतल्या खारमध्ये भीषण अपघाताची घटना घडली होती. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली. माजी खासदार आणि निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबरच्या सायंकाळी खार पश्चिममधील सीडी रोड-१६ वा रोड जंक्शनवर भीषण अपघात झाला होता. सुधीर सावंत यांच्या कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली होती. या अपघातामध्ये दुचाकीवरून प्रवास करणारे बीएमसी कर्मचारी अय्यप्पन सेल्वराज हरिजन (४१ वर्षे) यांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर माजी खासदार सुधीर सावंत यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात होती.

या अपघातामध्ये अय्यप्पन यांच्या पत्नी नॅन्सी हरिजन (३७ वर्षे) या जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या अपघातात अन्य एका स्कूटीचालकालाही कारने धडक दिल्याने त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये बीएमसी कर्मचारी अय्यप्पन कारखाली अडकले होते. स्थानिकांनी कार उचलून त्यांना बाहेर काढले पण उपचारादरम्यान अय्यप्पन यांचा मृत्यू झाला.

अखेर खार पोलिसांकडून सुधीर सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. BNS कलम १०६(१) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत कारवाई त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या अपघातानंतर रक्तदाब वाढल्याने सुधीर सावंत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डिस्चार्जनंतर त्यांच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who is Justice Shrihari Davare: उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांचा शिवसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या हाती घेतला धनुष्यबाण

Actress Death : आलियासोबत काम केलेल्या अभिनेत्रीचं अचानक निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

मुख्यमंत्रिपदासाठी शिंदेसेनेची फिल्डिंग? '2029मध्ये शिंदेंना मुख्यमंत्री करणार' शिंदेसेनेच्या मंत्र्यांचा निर्धार

शेतकऱ्यांना मदतीचे ट्रक पाठवले; तुम्ही बिस्कीटचा पुडा तरी नेला का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Uddhav Thackeray : मते चोरून सत्तेवर आलात, हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

SCROLL FOR NEXT