Clothes Ironing Tips: इस्त्री करूनही कपड्यांवरच्या सुरकुत्या जात नाहीत? हे 5 सोपे उपाय करून बघाच

Surabhi Jayashree Jagdish

सोपे उपाय

सकाळी ऑफिस किंवा कॉलेजला जाण्याच्या घाईत कपड्यांवरील सुरकुत्या पाहून अनेकदा गोंधळ उडतो. आवडता ड्रेस काढल्यावर त्यावर सुरकुत्या दिसल्या तर तयार होण्यासाठी जास्त वेळ लागतो. अनेकदा कपडे आधीच इस्त्री करून ठेवणं शक्य नसतं आणि सकाळी पुन्हा इस्त्री करण्यासाठी वेळ मिळत नाही. अशा वेळी काही सोप्या युक्त्या वापरून कमी वेळात कपड्यांवरील सुरकुत्या कमी करता येतात.

How to Remove Wrinkles

केसांचा स्ट्रेटनर

केस सरळ करण्यासाठी वापरला जाणारा स्ट्रेटनर कपड्यांवरील सुरकुत्या घालवण्यासाठीही उपयोगी पडू शकतो. शर्ट इस्त्री केल्यानंतरही कॉलर किंवा कडा नीट सरळ झाल्या नसतील तर स्ट्रेटनर वापरा. कपड्याचा सुरकुतलेला भाग स्ट्रेटनरच्या प्लेटमध्ये ठेवून हलक्या दाबाने हळूहळू पुढे सरकवा. यामुळे कॉलर आणि कपड्यांच्या लहान भागांवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

Hair Dryer for Clothes

गरम भांडं

सकाळी पाणी गरम करत असाल तर त्याच गरम पाण्याचा उपयोग कपड्यांवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी करू शकता. यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन ते काही वेळ गरम राहू द्या. त्यानंतर हे गरम भांडे शर्ट, ड्रेस किंवा कुर्त्यावर काळजीपूर्वक फिरवा. भांड्याच्या उष्णतेमुळे कपड्यांवरील हलक्या सुरकुत्या कमी होऊ शकतात.

Morning Clothing Hacks

पाणी किंवा स्प्रेचा करा वापर

कोरड्या कपड्यांच्या तुलनेत किंचित ओलसर कपड्यांवरील सुरकुत्या काढणं सोपं असतं. यासाठी एका कप पाण्यात थोडे फॅब्रिक सॉफ्टनर आणि रबिंग अल्कोहोल मिसळून स्प्रे तयार करा. हा स्प्रे कपड्यांवर हलक्या प्रमाणात मारा आणि कपडे सुकू द्या. दुसरा पर्याय म्हणजे पाणी आणि पांढरे व्हिनेगर एकत्र करून हा स्प्रे सुरकुत्या असलेल्या भागावर मारा आणि कपडे सुकू द्या.

Fabric Softener Spray

हेअर ड्रायर

इस्त्री करण्यासाठी वेळ नसेल तर कपड्यांवरील हलक्या सुरकुत्या कमी करण्यासाठी हेअर ड्रायर वापरू शकता. सर्वप्रथम कपड्यांवर थोडे पाणी किंवा इस्त्रीसाठी वापरला जाणारा स्प्रे मारा. त्यानंतर हेअर ड्रायर सुरू करून कपड्यांपासून थोड्या अंतरावर ठेवा. ड्रायर एकाच ठिकाणी जास्त वेळ न ठेवता कपड्यांवर सतत फिरवत राहा.

Vinegar Spray for Clothes

ड्रायरमध्ये बर्फाचे तुकडे टाका

सुरकुत्या असलेले कपडे ड्रायरमध्ये दोन ते तीन बर्फाच्या तुकड्यांसोबत ठेवा. त्यानंतर ड्रायर साधारण १० ते १५ मिनिटं गरम सेटिंगवर सुरू करा. बर्फ वितळल्यामुळे तयार होणारी वाफ कपड्यांचे धागे मऊ करण्यास मदत करते. त्यामुळे हलक्या सुरकुत्या कमी होऊ शकतात.

Clothes Maintenance Tips

या गोष्टी लक्षात ठेवा

कपड्यांना इस्त्री करताना सर्वात आधी योग्य तापमान निवडणं गरजेचं आहे. प्रत्येक कपड्याला सारखी उष्णता सहन होत नाही. इस्त्री केल्यानंतर कपड्याचा रंग बदललेला दिसला आणि तो पुन्हा पुन्हा तसाच झाला नाही तर इस्त्रीचे तापमान जास्त असू शकतं.

Ironing Alternatives

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे? जाणून घ्या कारणं

Shivaji Maharaj military campaigns | saam tv
येथे क्लिक करा